१९४७ साली एक बालक जन्माला आले
माय-पित्यांनी त्याचे नाव चंदाराणी ठेवले
त्याच वेळी मी बिगर राज्याची राणी झाले
नेहमीच विजय तर कधीतरी हार झाली
आणि त्या हारेलाच एक वेगळी धार आली
आयुष्याच्या सुखदु:खांशी मर्दानीपने लढली
संकटाच्या सार्या थव्यांनी आता माघार घेतली
स्त्री म्हणून सारे चटके मी एकटीनेच घेतले
या सार्या चोथ्याचे राज्य माझे असेच उभे राहिले
शेवटच्या घटकेला माझे मलाच उमगले
कुठले राज्य – कुठली राणी.. हे तर अळवावरचे पाणी होते
येणार्या काळाचे मी एक छोटे सावज होते….
– चंदाराणी कोंडाळकर
Leave a Reply