ठेवून पाऊल चंद्रावरी अभिमान तुला वाटला /
मान उंचावूनी आपुली वर्णन करीता झाला //
चंद्र आहे ओबड धोबड तेथे सारे खडकाळ असे /
झाडे झुडपे पशु पक्षी हवा पाणी कांही नसे //
नमुने आणले दगड मातीचे चंद्रावरी तू जाऊन /
शुष्क आहे वातावरण असेच केले वर्णन //
बघितले बाह्य रूप ह्या रजनीकांताचे /
थोटका पडलास तू शोध घेण्या अंतरीचे //
तेच आहे मधुर चांदणे चंद्रातील शितलतेचे /
आजही वाटतो आल्हाद बघता रूप पौर्णिमेचे //
चंद्र आहे कवीची स्फूर्ती बालकाचे तोच गीत /
प्रेमिका देण्या आनंद मग्न तो सदोदित //
चंद्र आहे मुकुट मणी निसर्गाच्या सौंदर्याचा /
ऐकून त्याचे बाह्य रूप आनंद कमी न होई त्याचा //
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@ gmail.com
Leave a Reply