आज नवरात्रीच्या ऊत्सवाचा तिसरा दिवस.दुर्गामातेच्या आजच्या रुपाचं वर्णन आणि महत्व काया आहे याची माहिती आपण घेणार आहोत.या रुपामध्ये मातेने सिंहाला आपले वाहन म्हणून निवडले असून तिचा तिसरा नेत्र सतत ऊघडा असतो ज्यामुळे दानवांचा-राक्षसांचा अत्याचार नष्ट करण्यासाठी लक्ष ठेवते. दानवांचा-राक्षसांचा नायनाट करण्यासाठी दहा शस्रांचा वापरा केलेला आहे.अर्थातच चंद्रघण्टा मातेला दहा हात आहेत.
धनुष्य,बाण,कमंडलु,तलवार,अक्षरमाला,गदा,त्रिशुळ,कमलपुष्प धारण केलेले असून भक्तांना अभय देण्यासाठी एका हाताने आशिर्वादही दिलेला आहे. चंद्रखडा,रणचंडी तसेच चंडीका या नावानेही तिला ओळखले जाते.
सुवर्णकांतिच्या माता चंद्रघण्टेच्या मस्तकावर अर्धचंद्राच्या आकाराचा मुकूट आहे.दुष्ट दानवांचा-राक्षसांचा निःप्पात करण्यासाठी सतत युध्दाच्या तयारीत ती आहे.तिच्या साधकाला दिव्य ध्वनी,अद्भुत सुगंध यांची अनुभूती येतेच.तिचा साधक हा साधनेद्वारे मिळालेल्या शक्तिमुळे वाघ-सिंहा प्रमाणे शूर,धाडसी,भय-भिती न बाळगणारा आणि विनम्र असा बनतो.बाधा,भूत,प्रेत,नकारात्मकता,मानसिक दोलायमानता नष्ट होते.साधकाचे “मणिपूर”हे महत्वाचे चक्र तिच्या ऊपासनेद्वारा जागृत होते.
जपः- पिण्डजप्रवरारुढा चण्डकोपास्रकैयुता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेनि विश्रुता।।
गोकर्णी,कृण्षकमळ वा कुठलेही निळ्या रंगाचे फुल किंवा फुले आज माता चंद्रघण्टेला अर्पण करतात.आज शुक्रवार असल्यामुळे आज तिने हिरव्या वस्त्र प्रावरणांना महत्व दिले आहे.हिरवी अंगवस्त्रे आणि हिरवीच फुले माला धारण केलेल्या चार वर्षे वयाच्या कन्येची पुजा करावी असा देवीकोषात ऊल्लेख आहे.”कल्याणी”या नाव धारण केलेल्या या दुर्गारुपाची मनोभावे पूजा केल्यास धर्म आणि अर्थ प्राप्ती होते.आज तिला लोण्याचा नैवेद्य दाखवावा.असे सागितले आहे. आज तिला प्रार्थुन प्रसन्न करून घेऊ.
— गजानन सिताराम शेपाळ
Leave a Reply