जमिनीवर पसरणारे कडे कपारीत उगवणारे क्षुप आहे.ह्याचा तीन पानांचा खंड एकमेकांना खालच्या भागात जोडलेला असतो.पर्ववृन्त लांब असून त्यास उपपत्र चिकटलेले असतात.फुले लहान व पिवळ्या रंगाची असतात.फळे लांबट व रोमश असतात.
ह्याचे उपयुक्तांग पंचांग आहे.ह्याची चव आंबट,तुरट असून चांगेरी उष्ण गुणाची आहे व हल्की व रूक्ष आहे.चांगेरी कफ व वातनाशक असून पित्त वाढविते.
आता आपण हिचे उपयोग पाहूयात:
१)वेदना व सुजेवर चांगेरीचा लेप लावावा.
२)त्वचारोगात देखील चांगेरीचा लेप लावावा.
३)मुळव्याधी मध्ये देखील चांगेरी उपयुक्त आहे.
४)चांदेकर रक्तवाहीन्यांचा संकोच करून रक्तस्राव थांबवायला मदत करते.
५)गुदभ्रंशात चांगेरीचे तूप खायला देतात व चांगेरी सिद्ध तेलाचा पिचू गुद भागी ठेवतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
स्वातीजी, माझे मित्र जग्गू ज्यांचा भोमा पंचायतीजवळ रात्री ७ ते पहाटे ७ असा चहाचा गाडा आहे. त्यांना चांगेरीचे रोप मिळेल का. आपणास संपर्क केला तर चालेल का.
आता मी ना.. शंतनू गरुड. तुमच्या गोमन्तक वर्तमानपत्रात अनुवादक. 9850209563
कळवावे, ही विनंती.