नवीन लेखन...

चौधरी चरण सिंह

देशाचे माजी पंतप्रधान व जेष्ठ शेतकरी नेते  चौधरी चरण सिंह यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.
यांचा जन्म दि. २३ डिसेंबर १९०२  रोजी

चौधरी चरण सिंह यांचा अल्पपरिचय.

चौधरी चरण सिंहानी आपले संपूर्ण जीवन भारतीयता आणि ग्रामीण परीवेशाच्या मर्यादेत व्यतीत केले. चौधरी चरण सिंह यांचा जन्म एका जाट परिवारात झाला. स्वातंत्र्याच्या वेळी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ते राम मनोहर लोहिया यांच्या ग्रामीण सुधार आंदोलनात सहभागी झाले. त्यांना शेतकऱ्यांचा नेता मानले जाते. चौधरी चरण सिंह यांनी १९२३ मध्ये विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. १९२५ मध्ये आग्रा विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या चौधरी चरण सिंह यांनी गाजियाबाद येथून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. १९२९ मध्ये ते मेरठ येथे आले आणि नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

चौधरी चरण सिंह हे सर्वप्रथम १९३७ मध्ये छपरोली येथून उत्तरप्रदेश विधानसभेसाठी निवडले गेले आणि १९४६, १९५२, १९६२ व १९६७ मध्ये विधानसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९४६ मध्ये ते पंडित गोविंद वल्लभ पंत यांच्या सरकारमध्ये संसद सचिव बनले. त्यानंतर महसूल, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य न्याय, माहिती इत्यादी विविध विभागात त्यांनी काम केले. जून १९५१ मध्ये त्यांना राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आणि न्याय व माहिती विभागाचा कार्यभार देण्यात आला. नंतर १९५२ साली ते डॉ.संपूर्णानंद यांच्या मंत्रिमंडळात महसूल व कृषी मंत्री बनले. एप्रिल १९५९ मध्ये त्यांनी राजीनामा दिला, तेव्हा त्यांच्याकडे महसूल व परिवहन खात्याची जबाबदारी होती.
सी. बी. गुप्ता यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते गृह व कृषी मंत्री होते. श्रीमती सुचेता कृपलानी यांच्या मंत्रिमंडळामध्ये श्री. चरण सिंह कृषी व वन मंत्री होते. १९६५ मध्ये त्यांनी कृषी विभाग सोडून दिला आणि १९६६ पासून स्थानिक स्वयंप्रशासन विभागाची जबाबदारी घेतली. कॉंग्रेसच्या विभाजनानंतर फेब्रुवारी १९७० मध्ये ते कॉंग्रेसच्या पाठींब्याने दुसऱ्यांदा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. परंतु पुढे २ ऑक्टोबर १९७० पासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. नंतर चौधरी चरण सिंह हे भारताचे सातवे पंतप्रधान बनले. त्यांनी २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० पर्यंत पंतप्रधानपद सांभाळले.

चरण सिंह यांनी विविध पदांवर उत्तरप्रदेश राज्याची सेवा केली. त्यांची ख्याती एका अशा कणखर नेत्याच्या रुपात झाली होती, जे प्रशासनात अकार्यक्षमता व भ्रष्टाचारला अजिबात थारा देत नसत. प्रतिभाशाली खासदार व व्यवहारवादी असलेले श्री. चरण सिंह आपल्या वक्तृत्व व दृढविश्वासासाठी ओळखले जातात. उत्तरप्रदेशातील जमीन सुधारणा कार्याचे संपूर्ण श्रेय चरण सिंह यांना जाते. ग्रामीण कर्जदारांना दिलासादायक ठरलेले विभागीय कर्जमुक्ती विधेयक, १९३९ तयार करण्यात आणि अंतिम प्रारूप देण्यामध्ये श्री. चरण सिंह यांची महत्वपूर्ण भूमिका होती. त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे उत्तरप्रदेशातील मंत्र्यांचे वेतन व त्यांना मिळणाऱ्या अन्य लाभांचे प्रमाण बरेच कमी करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणून जमीन धारणा कायदा, १९६० बनविण्यामध्येही महत्वपूर्ण भूमिका होती. हा कायदा मालकी हक्कात जमीन राखून ठेवण्याच्या कमाल प्रमाणावर बंधन आणण्याच्या दृष्टीने करण्यात आला होता. जेणेकरून राज्यभरात याला एकसमान बनवता येऊ शकेल. देशात असे निवडक राजकारणी होऊन गेले ज्यांनी लोकांमध्ये राहून सहजतेने काम करत लोकप्रियता मिळवली. एक समर्पित लोक कार्यकर्ता व सामाजिक न्यायावर दृढविश्वास ठेवणाऱ्या श्री. चरण सिंहांना लाखो शेतकऱ्यांमध्ये राहून आत्मविश्वास मिळाला, ज्याने त्यांची ताकद वाढवली. श्री. चौधरी चरण सिंह अत्यंत साधे जीवन जगले. मोकळ्या वेळात ते वाचन व लेखन करत त्यांनी अनेक पुस्तके व प्रचार-पुस्तिका लिहिल्या ज्यामध्ये ‘जमीनदारी निर्मूलन’, ‘भारतातील गरीबी व त्यावरील उपाय’, ‘शेतकऱ्यांची मालकी की शेतकऱ्यांसाठी जमीन’, ‘प्रिवेन्शन ऑफ डिविजन ऑफ होल्डिंग्स बिलो ए सर्टन मिनिमम’, ‘को-ऑपरेटीव फार्मिंग एक्स-रेड’ ही काही प्रमुख आहेत.
चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिन २३ डिसेंबर रोजी असतो म्हणून भारतात राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी देशभरामध्ये शेतकरी म्हणजेच आपला अन्नदाता करत असलेल्या मेहनतीला कृतज्ञता व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंग यांनी भरीव कामगिरी केली होती. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांची स्थापना त्यांनी केली. २००१ साली अटल बिहारी बाजपेयी यांच्या सरकारमध्ये चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला. चौधरी चरण सिंह यांचे २९ मे १९८७ रोजी निधन झाले.

-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..