तूं भाबड्या मनाची तुज काय हें कळावे |
जग हे असेंच असतें तू दूर का पळावे ?
तूज दावितील भाकरी
पाठीत मारतील सुरी
सतत तूझिया मनी नित्य सळत रहावे
जग हे असेच असतें तू दूर का पळावे || १ ||
सर्व तुला लुटतील
आणि दूर सारतील
संकटांशी हसत झुंज देण्यास ती शिकावे
जग हे असेंच असतें तू दूर का पळावे || २ ||
तुज भेटतील देव येथे
भेटतील राक्षसही
नियम बध्द वागणे सतत तुझे रहावे
जग हे असेंच असतें तू दूर का पळावे || ३ ||
— चंदाराणी कोंडाळकर
Leave a Reply