नवीन लेखन...

एमबीए पदवीधर असणारी पहिली महिला सरपंच – छवी राजावत

‘भारतातील एमबीए पदवीधर असणारी पहिली महिला सरपंच’ अशी ओळख असलेल्या आणि ग्रामीण विकास या विषयात भारतात अलीकडच्या काळातील एक महत्त्वपूर्ण युवा नाव असणाऱ्या छवी राजावत या सोडा गावच्या (राजस्थान) सरपंचांचे व्याख्यान ऐकण्याची संधी पुणेकरांना नुकतीच मिळाली.  “सकाळ’चे संस्थापक- संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात छवी राजावत यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून  “सामाजिक बदलांमध्ये युवा शक्तीचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान दिले.

मुंबईमधील मल्टीनॅशनल कंपनीत तगड्या पगाराची नोकरी सोडून राज्यस्थानच्या टोंक जिल्यातील सोढा पंचायतीची सरपंच छवी राजावत यांनी पूर्ण पंचायतीला आदर्श पंचायतमध्ये परिवर्तीत केले आहे. गावाच्या विकासासाठी त्या सरकारी पैशांवर निर्भर न रहाता, खाजगी क्षेत्रातून गुंतवणूकीची व्यवस्था करीत आहे. सोढा मध्ये पाणी, वीज, रस्त्यांच्या सुविधांचा अभाव या हद्दपार झालेल्या गोष्टी आहेत आता इथला ऐरणीचा विषय म्हणजे गावात बँक, एटीम, सौर उर्जा, सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची सोय या व्यतिरिक्त जनावरांच्या चाऱ्यासाठी एखाद्या जागेची सोय. दिल्लीतील कॉलेज मधून आलेल्या मुलींशी गावातील स्त्रिया व मुली, मासिक पाळी व प्रसूती या मोकळेपणाने न बोलता येणाऱ्या विषयांवर चर्चा करू लागल्या.

छवी आपल्या एका मुलाखतीत म्हणतात.”माझे एकच स्वप्न आहे की गावातील प्रत्येक मुलगी ही शहरातील मुलींसारखी आॅलराऊंडर बनोत. स्वातंत्र्यानंतर सुद्धा आज आपण पाणी, वीज व रस्त्यांसारख्या अडचणींमधून स्वतःला बाहेर काढू शकत नाही ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही विकासाच्या दिशेला गती देऊन वाटचाल करू इच्छितो”.

सहा वर्षापूर्वी छवी प्रथमच सरपंच बनल्या, तेव्हा त्यापण सर्वसामान्य विचार करत होत्या की गावात कमीत कमी पिण्याच्या पाण्याची सोय झाली पाहिजे. छवी एमबीए करून मुंबईच्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काही लाखांच्या पॅकेजवर नोकरी करीत होत्या. एकदा सुट्ट्यांमध्ये गावाला आल्यावर गावकऱ्यांनी तिला सरपंच बनण्यासाठी गळ घातली. महानगरातील आयुष्य जगणारी आणि घोडेस्वारीचा छंद असणारी छवी यांना ही एक थट्टा वाटत होती. घरच्यांच्या आग्रहाखातर आढेवेढे घेत छवी यांनी सरपंचपदाची निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या. आपल्या गावाची बिकट परिस्थिती बघून छवी यांनी गावाच्या विकासाचा विचार केला. पण सरकारच्या नियमानुसार गावाचा विकास करणे सोपे नव्हते. गावातील मोठी समस्या म्हणजे पाण्याची कारण गावातील स्त्रियांना खूप लांबून पाणी आणावे लागायचे तेव्हा छवी यांनी पाणी व्यवस्थापनेच्या तज्ञाला बोलावून गावाचे निरीक्षण करून एक अहवाल तयार केला. जर गावात तलावाला १०० एकरच्या मोठ्या जलाशयामध्ये रुपांतरीत केले तर गावाची समस्या दूर होईल त्याप्रमाणे कमीत कमी अंदाजपत्रक हे २ करोड रुपयांचे झाले. छवी यांच्या सरकारी कार्यालयांच्या चकरा सुरु झाल्या तेव्हा त्यांना कळले की अशी कोणतीही योजना नाही जिथे २० लाखांपेक्षा जास्त रक्कम गावातील तलावासाठी मंजूर होईल. या व्यतिरिक्त सरकार आजपण गावात मशीनने काम करण्यासाठी पैसे देत नाही, म्हणून सगळ्या गावाने मिळून श्रमदान सुरु केले. पण तज्ज्ञांनी सांगितले की या पद्धतीने तलाव खोदण्यासाठी २० वर्ष लागतील. छवी म्हणतात की,’’ तेव्हा मी प्रचंड उदास झाले वाटत होते की माझे प्रयत्न निष्फळ ठरत आहे, मी सरपंच का झाले? तेव्हा माझ्या आई वडिलांनी व काकांनी सांगितले की आम्ही आमचे पैसे तुझ्या आनंदासाठी देऊ’’.

छवी यांनी हार न मानता कुटुंब व मित्रांकडून पैसे घेऊन काम सुरु केले. काही लोकांनी पेपर मध्ये बातमी वाचून चेक पाठवले आणि आज सोढा गावातील हा तलाव लोकांसाठी लाईफलाईन बनला आहे. या तलावाच्या किनाऱ्याजवळील कूपनलिकांना सुद्धा पाणी येवू लागले आहे. सोढाच्या गीता देवी सांगतात, ‘आमच्या या मुलीने पाण्यासाठी होणारी आमची वणवण थांबवली. गावात तलाव बांधल्यामुळे विहिरींना तसेच कूपनलिकेला खूप पाणी येत आहे. पाण्यासाठी आता बाहेर जाण्याची गरज पडत नाही”. इथूनच गावच्या राजकारणाला सुरवात झाली. हरलेल्या विरोधी सरपंचाला छवीचे यश बघवले नाही त्यांनी गावातच जातीच्या आधारावर दोन गट बनवून त्यांच्यात हाणामारी सुरु केली. छवी सांगतात की गायरान करण्यावरून काही लोकांनी आमच्यावर हल्ला केला ज्यात छवी व त्यांचे वडिल गंभीर जखमी झाले व त्यांना दवाखान्यात भरती करावे लागले पण यामुळे त्या अधिक खंबीर बनल्या आहे. पण आजमितीला हल्लेखोरांनी सुद्धा छवी यांच्या बाजूने उभे रहाण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एकदा छवी पंचायतभवन मध्ये बसतात, पेंशन पासून जन्म-मृत्यूचा दाखला बनवण्यापर्यंत सगळे व्यवहार हे ऑनलाईन होतात.  छवी यांनी गावात पाण्याची टाकी बसवली आहे जिच्या पाईपलाईनद्वारे पाणी नळाने प्रत्येक घरात येण्याची सोय झाली. गावतील रस्ते असो किंवा वीज प्रत्येक गरजेच्या गोष्टींची सुविधा छवी स्वतः करतात. जिथे पूर्वी सहा तास सुद्धा वीज नसायची तिथे आता २४ तास वीज सेवा उपलब्ध असते. गावातील दूर असणाऱ्या ज्या घरांमध्ये वीजमंडळाने निधी नसल्याची बतावणी करत विजेच्या तारा जोडल्या नाही, तिथेच दिल्लीच्या एका खाजगी कंपनीच्या मदतीने सौरउर्जेची व्यवस्था करण्यात आली आहे. सौरउर्जेच्या या व्यवस्थेसाठी व घर प्रकाशमय होण्यासाठी १५० रुपये सुविधा कर भरावा लागतो. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घरात पडणाऱ्या प्रकाशाने गावकरी खूप आनंदी होते. ६० वर्षाच्या राजी रामने जीवनात पहिल्यांदाच वीज बघितली जेव्हा सौरउर्जेने घर प्रकाशित झाले. रामजी सांगतात की, “नातवंड आता रात्रीपण अभ्यास करतात. ते सुद्धा प्रकाशात जेवण करतात’’.

छवी यांची वाटचाल सुरूच राहिली त्यांनी गावात स्टेटबँक व एटीम सुरु केले. याव्यतिरिक्त गावात सफाई कर्मचाऱ्यांकडून सार्वजनिक सफाई करून घेतली जाते. तसेच गावात प्रत्येक घरात शौचालय आहे त्यासाठी सरकारकडून १२००० रुपयांचा प्रत्येक घरासाठी निधी मंजूर केला आहे. गावातील स्त्रियांसाठी सुद्धा त्यांनी बाहेर शौचाला जाण्यासाठी बंदी घातली आहे. आंगणवाडीच्या कार्यकर्त्या उषा परीक सांगतात की आम्ही सकाळी उठून या सगळ्या गोष्टींची देखरेख करतो तसेच स्त्रियांना समजावून त्यांच्या सवयी बदलतो, त्यामुळे आता गावाचा खूप कायापालट झाला आहे.

स्वच्छतेप्रती ते एका खाजगी कंपनीच्या मदतीने या टाकाऊ पदार्थांच्या विघटनाच्या व्यवस्थापनेपासून बायोडेग्रेबलच्या मालापासून उर्जा बनवली जाते. या गावात असा नूतन प्रयोग राबवून छवी सांगतात की हा माझा ‘’ड्रीम प्रोजेक्ट’’ आहे ज्यासाठी मी मल्टीनॅशनल कंपनीशी टायअप करून निधी गोळा करीत आहे. तसेच पूर्ण गावात सगळ्यात आकर्षक व चांगली योजना म्हणजे गावासाठी एक परिपूर्ण जंगल बनवण्याची आहे जिथे ३५ हजार झाडे लावली तर आहेच त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे गवत येथील जलप्रकृती व मातीच्या हिशोबाने लावल्यामुळे चाऱ्यासाठी काटकसरीचा गावक-यांचा प्रश्न मिटला आहे. शेताला कुंपण घातल्यामुळे चरण्यासाठी सोडलेले जनावरेही सुरक्षित रहातात.

छवी यांच्या सोढा गावातील आवाज दिल्ली पर्यंत पोहचला आहे. तिथून कॉलेजचे मुले -मुली सोढा गावात येऊन गावकऱ्यांना देश व समाजातील नवीन माहिती विषयी कल्पना देतात. तसेच स्त्रियांच्या मासिक  पाळीच्या नाजूक विषयांवर चर्चा करून समजावतात की ही वाईट गोष्ट नसून जीवनाचा एक सामान्य भाग आहे. दिल्ली विश्वविद्यालयाची विद्यार्थिनी सांगते की, “प्रथम मुली मासिक पाळी विषयी बोलत नव्हत्या पण आता त्या मोकळेपणाने आपली समस्या मांडतात व आम्ही त्यावर निदान करतो”. या व्यतिरिक्त छवी यांनी स्वखर्चाने गावात बीएड कॉलेज व कौशल्य केंद्र उघडले आहे ज्यामध्ये प्रशिक्षण दिले जाते. एका गावात याप्रकारे परिवर्तन व विकास बघून वाटते की जर शिक्षित तरुण पिढीने गावाच्या राजकारणात सक्रीय होऊन भाग घेतला तर प्रत्येक गावाचा कायापालट निश्चित होईल.

संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
लेखिका : रिम्पी कुमारी अनुवाद : किरण ठाकरे
संदर्भ.युथ स्टोरी

 पूजा
poojapradhan323@gmail.com
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..