नवीन लेखन...

छत्रपती संभाजीराजे

जन्म.११ फेब्रुवारी १९७१

छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज आहेत. कोल्हापूरच्या राजघराण्याशी ते संबंधित आहेत. त्यांना समाजकारणाचीही आवड आहे. यातूनच त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या आहेत. अनेक सामाजिक क्षेत्रात ते काम करत आहेत. एम.बी.ए.पर्यंत शिक्षण घेतलेल्या संभाजीराजे खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांचे आहेत. छत्रपती श्री शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे केवळ नाव घेवून ते थांबत नाहीत तर त्यांच्या कार्याचा वारसा ते पुढे चालवत आहेत.

आज पर्यंत संभाजीराजेंनी उपेक्षित घटकांसाठी भरपूर काम केलेले आहे. उपेक्षित घटकांसाठी सतत काहीतरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या जीवनात आशावाद निर्माण करण्यासाठी ते धडपडत असतात. त्यांच्या कार्यातून त्यांचे अष्टपैलुत्वच जाणवते. संभाजीराजे छत्रपती हे छत्रपती श्री शिवराय व राजर्षी शाहू महाराज यांचा केवळ जन्मानेच नव्हे तर आपल्या कार्याने वारसा चालवणारे युवराज आहेत. तमाम मराठी माणसाच्या जीवनातील सुवर्ण आनंदाचा क्षण म्हणजे रायगड किल्ल्यावर ६ जुन २००८ रोजी घडलेला इतिहास होय. साडेतीनशे वर्ष झाली तरी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या राजसदरेवर शिवरायांचा पुतळा नव्हता. मेघडंबरी म्हणजे छत्र आहे, पण त्या मेघडंबरी मध्ये शिवरायांचा पुतळा नाही अशी परिस्थिती होती. या मेघडंबरीत पुतळा बसविणे हि काही सामान्य गोष्ट नव्हती. हा किल्ला भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने तेथे कोणतीही नवीन गोष्ट करण्यास बंदी होती. यासाठी युवराज संभाजीराजेंनी पुरातत्व खात्याशी सातत्याने पाठपुरावा करून पुतळा बसविण्यास परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण परवानगी मिळत नव्हती. शेवटी ६ जुन २००८ हा दिवस पुतळा बसविण्यासाठी निश्चित करण्यात आला. छत्रपती शिवरायांचा भव्य सिंहासनाधीष्टीत पुतळा तयार करून त्याची भव्य ऐतिहासिक मिरवणूक राज्यातील प्रमुख शहरातून काढण्यात आली. महाराष्ट्रातून हजारो शिवभक़्त रायगड किल्ल्यावर जमा झाले. शेवटी केंद्र सरकारला याची नोंद घेवून रायगड किल्ल्यावर छत्रपती श्री शिवरायांचा पुतळा मेघडंबरीत बसविण्यात परवानगी द्यावी लागली. रायगड किल्ल्यावर घेण्यात आलेला अतिभव्य असा राजसदरेवर छत्रपती श्री शिवरायांचा पुतळा बसविण्यात ही ते यशस्वी झाले आहेत.

छत्रपती संभाजीराजे यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या वतीने कोल्हापूरमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती घराण्याला मोठा मान आहे. विद्यमान श्रीमंत शाहू महाराज यांच्याकडे सर्व पक्ष आदराने पाहतात. तर, त्यांचे थोरले पुत्र युवराज संभाजीराजे व युवराज मालोजीराजे यांनी आजवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षांबरोबरच आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवलेली होती.

२०१६ मध्ये राष्ट्रपतींनी छत्रपती संभाजीराजेंची राज्यसभेवर निवड केली. जराशीही पूर्वकल्पना न देता थेट राष्ट्रपतींनी अचानक छत्रपती संभाजीराजेंची राज्यसभेवर निवड केल्याने महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारण ढवळून निघाले. छत्रपती संभाजीराजेंच्या खासदारकीमुळे अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. नंतर राज्यातील शिवकालीन किल्ले व गड यांचे संवर्धन करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांची पर्यटन दूत म्हणून निवड करण्यात आली होती.

छत्रपती संभाजीराजे राबवत असलेल्या गड-किल्ले सुशोभिकरण मोहिमेमुळे तरूणांमध्ये ते खूप लोकप्रिय झाले आहेत. अनेक तरूण या मोहिमेत सक्रिय सहभाग घेहून किल्ले स्वच्छतेसाठी श्रमदान करत आहेत. या मोहिमेमुळे किल्यांचे रूपडे पालटत आहे. शिवाय किल्ला पर्यटनामध्ये वाढही झाली आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..