नवीन लेखन...

छत्री (मी आणि ती कथा)

आज पाऊस भरपूर आहे,
छत्री घेऊन ये….ती म्हणाली.
मी हो म्हणालो…
पण छत्री घेतली नाही …
दोघांच्या दोन वेगळ्या छत्र्या म्हणजे ..
काही एन्जॉय करता येत नाही..
एका लहान छ्त्रीतली कमी जागा
खूप महत्वाची वाटते….
आपण कमी भिजावे म्हणून ..
जी एका छ्त्रीतली ‘ अडचण ‘ निर्माण करतो..
त्यातच मजा असते…
आपण जी एफ बरोबर फिरताना
लहान छत्री महत्वाची असते.
आणि आपण अशावेळी छत्री नेणे म्हणजे
टू मच मूर्खपणा…
मी छत्री घेतलीच नाही….
ऑटो ने ठरल्या ठिकाणी उतरलो..
पाऊस धूम पडत होता….
मी धावत जाऊन, दुकानाच्या छपराखाली
उभा राहिलो….
ती थोड्या वेळात आली…
रिक्षाने …पाऊस तसाच होता…
मला बघीतल्यावर तिने रिक्षा
फिरवून माझ्या समोर आणली…
आत ये…
ती म्हणाली…
तिने ओळखले..
मी छत्री नाही आणली…
रागावून म्हणाली…
तू पण नाही आणली…..
म्हणजे तू नाही आणली….
मला वाटले तू आणशील…
आम्ही रिक्षाने जात होतो..
तितक्यात रस्त्यात कोपऱ्यात..
छत्रीवाला छत्र्या विकत होता..
आम्ही रिक्षातून उतरलो…
ती म्हणाली एक छत्री घे…
मी २०० रुपये देऊन
छत्री घेतली..
पाऊस धूम कोसळतच होता…
छत्री तशी म्हणजे
हवीतशी लहानच होती….
आम्ही एका बाजूने कमीतकमी भिजण्याचा
प्रयत्न करता करता….
नकोसा पाऊस
हवाहवासा वाटू लागला होता..
तिने छत्री का आणली नाही…
हे मी तिला विचारलेही नाही…
आणि तिने छत्रीचा विषय काढलाही नाही..
आम्ही दोघे समोर समुद्र आहे त्या दिशेने जात होतो…
तिथे छत्रीची आवश्यकताही नव्हती..
परंतु आम्ही छत्री न बंद करता तसेच जात होतो…
पाणी अंगावर उसळत होते .
पण कमी भिजण्याचा नादात…
पार एकत्र झालो होतो….

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..