नवीन लेखन...

छोटीसी बात चित्रपट

अमोल पालेकर यांचे “शांतता कोर्ट चालू आहे” या नाटकातील काम बघून बासू चॅटर्जीनी त्यांना त्यांच्या सिनेमात काम करण्याची ऑफर दिली तेंव्हा त्याने त्यांना चक्क नकार दिला. तो सिनेमा होता – “पिया का घर”. त्यानंतर परत बासूदानी अमोल पालेकर यांनी मनू भंडारीच्या “यही सच है” या कादंबरीवर आधारित “रजनीगंधा” हा सिनेमा ऑफर केला. १९७४ साली आलेला हा चित्रपट “सुपर डूपर हिट” ठरला. मग बासुदांच्याच “छोटी सी बात” सिनेमातून अमोल पालेकरला “स्टार” ची ओळख मिळाली.

“छोटी सी बात” चित्रपटाची ची कथा अतिशय साधी, कोणाच्याही आयुष्यात घडणारी. अरुण प्रदीप (अमोल पालेकर) असं दोन नाव असलेला, नाकासमोर चालणारा एक मध्यमवर्गीय स्वप्नाळू तरुण आपलं प्रेम मिळवण्यासाठी बऱ्याच खटपटी करत असतो. बरं, या माणसाच्या पर्सनॅलिटीची जादू अशी असते की, याने कामासाठी बोलावल्यावर, याच्या हाताखाली काम करणारे लोक्स रेडिओवर कॉमेंट्री ऐकतात पण याचं काही ऐकत नाही आणि ऑफिसचा पीयून सुद्धा याला बघून कधी स्टूलावरून उभा राहत नाही. अरुणचं प्रेम असतं प्रभा (विद्या सिन्हा) नावाच्या तरुणीवर जी याचं आपल्यासाठी झुरणं मस्त एन्जॉय करत असते पण मनोमनी कुठेतरी तिला तो आवडलेला पण असतो. सिनेमांत खरा ट्विस्ट येतो जेंव्हा नागेश शास्त्री (असरानी) हा स्ट्रीट स्मार्ट तरुण कबाब में हड्डी बनून प्रेम कथेत घुसतो. त्याची style, रुबाब आणि प्रभाची त्याच्याशी मैत्री बघून अरुण अस्वस्थ होतो. नाना उपाय करून थकलेला अरुण शेवटी, लोकल मध्ये चिटकवलेल्या प्रेम प्रकरणात यश, वशीकरण वगैरे जाहिरातीसारखं आपलं सामान गुंडाळून दाखल होतो, खंडाळ्यातल्या कर्नल जुलियस नागेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग (अशोक कुमार)असं लांबलचक नाव असलेल्या लवगुरु कडे. हा कर्नल अरुणचं प्रेम मिळवायला कशी मदत करतो ही या सिनेमाची कथा.

७० च्या दशकातील बऱ्यापैकी शांत असलेल्या दक्षिण मुंबईतील लोकेशन्स, सलील चौधरीच संगीत (ये दिन क्या आये हे मुकेशचं गाणं अप्रतिम!) आणि मुख्य म्हणजे सगळ्यांचा अभिनय हे सगळं अगदी योग्य प्रमाणात जुळून आलं होतं. सुरुवातीच्या पहिल्या भागात अमोलची सतत झालेली फजिती आणि मग कर्नलच्या शिकवणीनंतर त्याने घेतलेला बदला हे झकास जमुन आलं.

अमोल पालेकर या सिनेमात larger than life असलेल्या भूमिकेत कधीच नव्हता. कुठल्याही गर्दीत दिसणारा तो एक सामान्य माणूस होता. उगाच व्हिलनच्या खिशात चावी ठेवून “चाबी अब मै तेरे जेब से निकाल कर हि ये ताला खोलुंगा पीटर” म्हणत हिरोगिरी करणाऱ्याच्या भानगडीत तो कधी पडला नाही. त्याला ते सूट देखील झाले नसते. चॉकलेटी चेहरा, सॉलिड व्यक्तिमत्व अशा सिनेमातील हिरोसाठी लागणाऱ्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी अमोल पालेकरकडे नव्हत्या पण रोज बस, लोकल मध्ये धक्के खात येणाऱ्या, आपली साधी,छोटी स्वप्न पुर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांना त्याच्या सिनेमात ८६ नंबरच्या बसमध्ये हळुवार फुलणारी, अगदी सहज घडणारी “छोटी सी बात” आपलीच गोष्ट वाटते आणि हेच या सिनेमाचे खरे यश आहे. छोटी सी बात या चित्रपटाचे निर्देशक होते बासु चटर्जी, निर्माता होते बलदेव राज चोपडा, लेखक होते शरद जोशी, संवाद व पटकथा बासु चटर्जी यांनी लिहिली होती, व यातील कलाकार होते अशोक कुमार, विद्या सिन्हा, अमोल पालेकर, असरानी, धर्मेन्द्र, हेमा मालिनी. व संगीतकार होते सलिल चौधरी व गीतकार योगेश होते.

— उन्मेष खानवाले.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

“छोटी सी बात” चित्रपट

https://www.youtube.com/watch?v=EYhNmOF8lvo

छोटी सी बात Audio Movie

https://www.youtube.com/watch?v=vrohBgYK8Xs

छोटी सी बात गाणी

https://www.youtube.com/watch?v=ILeG1kzODDM&t=11s

https://www.youtube.com/watch?v=ats8Y1yzgPI

https://www.youtube.com/watch?v=LAbBrRYjwBY

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..