नवीन लेखन...

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस

स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल युवा राजकारणी आणि आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असलेले देवेंद्र फडणवीस यांचा आज २२ जुलै २०१७ रोजी वाढदिवस. त्यांचा जन्म याच दिवशी १९७० साली झाला.

माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलाने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्री. त्यांचे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. सोशल मीडियामध्ये गेले काही महिने ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा आज प्रत्यक्षात अवतरली.

फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे. साहजिकच आई सरिता यांची इच्छा होती, की देवेंद्रनं बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर करून प्रगतशील शेतकरी व्हावे. त्यांनी बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले तथापि त्यांनी वडिलांप्रमाणे राजकारण अन् कायदा सोबत चालतात म्हणून वकील होणे निश्चित केले.

देवेंद्र फडणवीस विधी महाविद्यालयात शिकून त्यात सुवर्ण पदक मिळवले. परंतु वकिली केली नाही त्याला प्रचंड अभ्यास, अजोड वक्तृत्वाची जोड दिली. नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये तेव्हा एनएसयूआयचा दबदबा होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानणारी लॉबी वजनदार होती. त्यांना टक्कर देण्यासाठी देवेंद्रच्या नेतृत्वात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP)चे पॅनेल होते. ज्या विधी महाविद्यालयाच्या राजकारणात त्यांना यश आले नाही ते कॉलेज ज्या मतदारसंघात आहे, तिथूनच ते आमदार झाले. कमी वयात महापौर आणि आता मुख्यमंत्रीपदावर आहेत.

देवेंद्र फडणवीसांच्या मागे वडिल आणि काकूंची पुण्याई आहेच. पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वत:चे कष्टही महत्वाचे आहेत. ते १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौरपद होण्याचा मान मिळवला.

त्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून न पाहाता, आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केलं. त्यानंतर त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला. नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा केला. मतदार पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. २००४ सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले.

विधानसभेतही देवेंद्र यांची कामगिरी कायमच लक्षवेधी राहिली. त्यांची सातत्यपूर्ण कामगिरी आणि अभ्यासू आणि व्यासंगी लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. विधानसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर आहे.

आमदार म्हणून दुस-यांदा निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे लग्‍न झाले.त्यांचा विवाह हा नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरला होता.त्यांच्या पत्नी अमृता या नागपूरचे प्रसिद्ध डॉक्टर चारू रानडे आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.शरद रानडे यांच्या कन्या होत्या. देवेंद्रचे नीकटवर्तीय आणि मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी देवेंद्र आणि अमृता यांची भेट झाली होती,असे शैलेश सांगतात.दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.देवेन्द्र आणि अमृता यांना देविजा नावाची मुलगी आहे.

आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

— श्रीधर कुलकर्णी

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..