नवीन लेखन...

आव्हान चिनी ड्रॅगनचे – पुस्तक परिचय

चिनी ड्रॅगनचे गंभीर आव्हान हे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे, नचिकेत प्रकाशननी प्रकाशित केलेले,1962 चे चीनी आक्रमण, भारत चिनसंबधाचे आजचे स्वरुप, 2015-20 साली चीनसोबत युद्ध होईल का? असे अनेक पैलु सांगणारे सुबोध पुस्तक आहे.ब्रिगेडियर हेमंत महाजन यांना संरक्षण दलामधील 37 वर्षांच्या सेवेची पार्श्वभूमी आहे.

आपण चीनच्या पुढे नेहमिच गुडघे का टेकतो? चिनशी चर्चेतून काही निष्पन्न झाले आहे का? भारताची कुरापत काढणे सोपे आहे म्हणुन भारताला शह देऊन चीन जगाला आपण महासत्ता असल्याचा ईशारा देत आहे. चीन अभ्यास गट विशेषज्ञ आपण चिनशी कसे वागावे हे ठरवतात. त्यांच्या मनात तर चिनने घुसखोरी तर केली नाही? आपण चीनशी सामना करु शकत नाही असे त्यांना का वाटते.

1962 चे चीनी आक्रमण व आपले अपयश आपल्या सेनेचे नाही तर नेत्यांचे होते. 1962 च्या घोडचुकांपासून आपण काही शिकलो का? नव्या चीनी नेतृत्वाचा, भारताच्या धोरणात काही बदल झालेला दिसत नाही. व्यापार वाढवला की चीनचा आक्रमकता नाहीशी होईल का? 90टक्के भारतीयांचे मते चीन सुरक्षेच्या चिंतेचा विषय वाटतो.

भारतीम द्वीपकल्पाभोवती मोत्माची (नाविक तळाची) माळ चीन प्रस्थापित करत आहे. चीनभोवती भारतानेही आपला विळखा मजबूत करणे गरजेचे आहे. चीनला रोखण्याकरता जपान, व्हिएतनाम, तैवान आणि ईतर अनेक देशाची सामरिक भागीदारी करणे जरुरी आहे.
एकाच वेळी चीन, पाकिस्तान, दहशतवादी, माओवाद्यांशी युद्ध लढण्याची तयारी आवश्यक आहे. चीन ब्रह्मपुत्रेचे पाणी पळवतोय. चीनची आर्थिक घुसखोरी आणी बाजारपेठेत आक्रमण थाबंले पाहीजे. भारताच्या शेजार्‍यांशी मैत्री दृढ करण्यावर चीनचा भर आहे. भारत मात्र अंतर्गत सुरक्षेच्या चक्रव्युव्हात अडकला आहे. चीनमधील अंतर्गत कलह पण वाढतो आहे. चीनच्या मानवी हक्क धोरणाविरुद्ध आपण आवाज का ऊठवत नाही. तिबेट, सिकयांग, तैवान येथील स्वातंत्र्य चळवळी चिनचे मर्मस्थान आहे.

आपला चीनसंबंधीचा 1962 चा कटू अनुभव बिलकूल न विसरता भारताने एकात्मिक सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जर तुम्हाला युद्ध टाळायचं असेल तर युद्धाकरता सक्षम व सज्ज राहा. त्यासाठी प्रखर राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. लष्कराची, संरक्षणसामग्रीची सिद्धता आणि डावपेचांच्या आघाडीवरील प्रयत्नांना राजकीय नेतृत्वाच्या कणखर भूमिकेची जोड मिळाली, तर चीनचे आव्हान परतविणे भारताला मुळीच कठीण जाणार नाही. राजकीय नेतृत्वाचे सर्वात महत्वाचे काम असते राष्ट्रीय सुरक्षितता. जे राजकीय नेतृत्व देश सुरक्षित ठेवु शकत नाही त्याना राज्य करण्याचा अधिकार नाही.

चिनी ड्रॅगनचे गंभीर आव्हान बद्दल काही इंग्रजी पुस्तके आहेत. मराठीत मात्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीही नाहीत. ब्रिगेडियर हेमंत महाजननी बराच रिसर्च करून हे पुस्तक लिहिले आहे. चिनच्या उपद्रवी कारवाया करणार्‍याविषयी जनमानस जागृत करण्याचा खारीचा वाटा उचलावा अशी अपेक्षा आहे. ती पुरी करण्याचा प्रयत्न किती यशस्वी झाला आहे हे वाचकांनी ठरवायचे. अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती, भरपूर आकडेवारी, नकाशे आणि चित्रे यांनी हे पुस्तक अधिकच समृद्ध झाले आहे. इतके उत्तम पुस्तक नचिकेत प्रकाशनाने जाणीव पूर्वक प्रसिद्ध केले आहे. संरक्षण विषयावरील नक्षलवादाचे आव्हान, भारतीय स्थल सेना, भारतीय परमवीर, 1971 ची युद्धगाथा आणि पाणबुडीचे विलक्षण जग ही पाच पुस्तके नचिकेत ने या आधी प्रकाशित केली आहे. लेखक प्रकाशक यांचे अभिनंदन

चिनी ड्रॅगनचे गंभीर आव्हान : ब्रिगेडियर हेमंत महाजन
पृष्ठ : 208, किंमत : 200 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, मो. : 9225210130

 

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..