- भारतीय द्वीपकल्पाभोवती नाविक “तळाची माळ” चीन प्रस्थापित करीत आहे.
- चीन ब्रम्हपुत्रेचे पाणी पळवतोय. चीनची आर्थिक घुसखोरी आणि बाजारपेठेत आक्रमण थाबंले पाहिजे.
- आपण चीनच्या पुढे नेहमीच गुडघे का टेकतो? चीनशी चर्चेतून काही निष्पन्न झाले आहे का? भारताची कुरापत काढणे सोपे आहे म्हणून भारताला शह देऊन चीन जगाला आपण महासत्ता असल्याचा इशारा देत आहे.
- आपला चीनसंबंधीचा कटू अनुभव बिलकूल न विसरता भारताने एकात्मिक सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. एकाच वेळी चीन, पाकिस्तान, दहशतवादी, माओवाद्यांशी युद्ध लढण्याची तयारी आवश्यक आहे.
- जर तुम्हाला युद्ध टाळायचं असेल तर युद्धाकरिता सक्षम व सज्ज राहा. त्यासाठी प्रखर राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. लष्कराची, संरक्षण सामग्रीची सिद्धता आणि डावपेचांच्या आघाडीवरील प्रयत्नांना राजकीय नेतृत्वाच्या कणखर भूमिकेची जोड मिळाली, तर चीनचे आव्हान परतविणे भारताला मुळीच कठीण जाणार नाही.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply