MENU
नवीन लेखन...

चिरकाल स्मरणात राहणारे बाबूजी

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…. हे शब्द खरे ठरवत, हे गीत ज्या महान गायकाने आपल्या स्वत:च्या आवाजात साऱ्या जगाला ऐकविले आणि या पुढेही ऐकवीत राहणार ते सुधीर फडके तथा बाबूजी आपल्यामधून जाऊन अनेक वर्षे झाली तरी सुध्दा त्यांच्या गाण्यांमुळे ते निघून गेले यावर आपला विश्‍वास बसत नाही.

असंख्य भावगीते, चित्रपट संगीत याबरोबरच जीत रामायण सारखी अजरामर ठेव मराठी संगीत विश्वाला देऊन मराठी संगीत सृष्टीवर पाच नव्हे दहा नव्हे तर तब्बल पन्नास वर्षे अधिराज्य गाजविलेले ज्येष्ठ संगीतकार व गायक सुधीर फडके म्हणजे एक युगप्रवर्तक संगीतकार, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचा जन्मदाता, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराने प्रचंड प्रभावित झालेला एक प्रखर राष्ट्रभक्त, एक नितळ माणूस यापैकी कुठल्याही एकाच विशेषणाने बाबूजींची ओळख पुरी होणार नाही.

आयुष्याकडे समग्रतेने पाहणारी माणसे तर यापुढे दुर्मिळच होत चालली आहेत. म्हणून बाबूजींचे जाणे प्रत्येक रसिकाच्या मनाला विषण्ण करणारे ठरले आहे.

सुधीर फडके यांनी ३३२ गाण्यांना चाली लावल्या. त्यापैकी १९१ गाणी आशाताई भोसले त्यांनी गायली. १९४६ पासून बाबूजी संगीताच्या दुनियेत शिरले व पुढील पत्रास वर्षे तेथे मनमुराद वावरले. या काळात त्यांनी एक हजाराहून अधिक हिंदी मराठी जीतांना स्वरसाज चढविला व ८३ मराठी आणि २० हिंदी चित्रपटांना संगीत दिले. या कर्तृत्वामुळे सुधीर फडके हे नांव महाराष्ट्राचे व्यवच्छेदक बनले. शिवाय त्यामुळे मराठी संगीत समृध्द व संपन्नही झाले.

सुधीर फडके यांचे त्रण महाराष्ट्र कधीही विसरु शकणार नाही. म्हणून त्यांचे वर्णन गायक संगीतकार अशा शब्दात केले.

बाबूजी सर्वोत्तम गायक-संगीतकार होते याबद्दल कुणालाही शंका नाही. ते महान होते हे सांगायला एक गीत रामायण पुरेसे उदाहरण आहे. १९५५ सालच्या रामनवमीपासून सर्वप्रथम पुणे आकाशवाणीवरुन सुरु झालेले गीत रामायण मराठीपणाची सांस्कृतिक खूण म्हणून आजही ओळखली जाते. ग.दि. माडगूळकरांची गीत आणि बाबूजींची स्वररचना यांनी मराठी मनावर गारुड केले. हाच कार्यक्रम पुढे अनेक भाषांमधून सादर झाला पण त्याच्या मूळ चालींना कोणीच धक्का लावला नाही. यातच बाबूजींच मोठेपण कळून येतं. गीत रामायणाच्या गीतांबद्दल पु.ल. देशपांडे नेहमी म्हणायचे की, दवबिंदूंनी भिजेलल्या तृणपात्यांचा पायांना स्पर्श व्हावा तसा अनुभव मला गीत रामायणातील सुधीरच्या गाण्यातून अनेकवेळा आलेला आहे. लतादीदींनी तर जाहिरपणे असे सांगितले होते की, मराठी चित्रपट संगीताचा आणि भाव संगीताचा ढाचाच सुधीर फडके यांनी बदलला.

त्यांनी मराठी संगीतात क्रांतीच घडवून आणली. माझ्या सारख्या स्वातंत्र्यवीर सावरकर भक्ताला बाबूजींबद्दल सार्थ अभिमान वाटतो त्याचे कारण म्हणजे, ज्या अत्यंत बिकट परिस्थितीत बाबूजींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जो चित्रपट बनविला त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच. त्या चित्रपटासाठी बाबूजींनी आपल्या आयुष्याची फार महत्वाची म्हणजे १० ते १२ वर्षे खर्च केली. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील चित्रपट हा त्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा टप्पा ठरला. कारणही तसेच होते. त्यांच्या रक्‍ताच्या प्रत्येक थेंबा-थेंबात एक क्रांतिकारक लपला होता. त्यांच्या नसानसात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विलक्षण प्रभाव होता.

एकदा बालपणी बाबूजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटावयास गेले असता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना मोपल्याचे बंड हे पुस्तक बक्षिस म्हणून दिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांची सर्व पुस्तके त्यांनी गुप्तपणे मिळवून त्यांनी वाचून काढली. त्या पुस्तकांमुळे ते झपाटले गेले. त्याचा परिणाम असा झाला की, त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतला. क्रांतिकारकांना व्हायोलिनच्या पेटीतून बंदुका पोहचवण्याचे काम पार पाडून त्यांनी एका राष्ट्रभक्‍तीची प्रचिती दिली. गोवा स्वतंत्र झाला परंतु तेलु मस्कारन्हेस व मोहन रानडे हे स्वातंत्र्यसैनिक पोर्तुगीजांच्या लिस्बन येथील तुरुंगात खितपत पडले होते. बाबूजींनी मोहन रानडे विमोचन समिती स्थापन केली व रानडेंच्या मुक्ततेसाठी ‘पोर्तुगालवर यशस्वीपणे आंतरराष्ट्रीय दबाव आणला.

संगीताव्यतिरिक्‍त बाबूजींनी आणखी एक फार मोलाचे कार्य केले ते म्हणजे, गांधी वधानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना पकडले होते आणि त्या कार्यकर्त्याच्या घरादाराची होळी केली त्यापैकी अनेक जणांना बाबूजींनी आर्थिक मदत केली होती.

म्हणूनच सुधीर फडके हे नांव मराठी जनांच्या चिरकाल स्मरणात राहीले ते त्यांच्या गीत रामायण, वीर सावरकर चित्रपटांसाठी आणि प्रखर राष्ट्रभक्‍तीबद्दल

– विद्याधर ठाणेकर

Avatar
About विद्याधर ठाणेकर 16 Articles
विद्याधर ठाणेकर हे ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष आहेत. ते मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे कार्यवाह आहेत. ते ठाण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..