लोटांगण घालूनी शरण गेला, देव मंदिरीं तो
आदर दाखविण्या प्रभूचे ठायीं, प्रयत्न करितो
समर्पणाचे भाव दाखविण्या, देहाला वाकवी
मन जोपर्यंत विनम्र नसे, प्रयत्न व्यर्थ जाई
मंदिरी तुमचे शरिर असूनी, मन असे इतरीं
श्रम तुमचे निरर्थक बनूनी, मिळेल कसा श्रीहरी
इतरत्र राहूनी चित्त तुमचे, असतां मंदिराकडे
खरे पुण्य ते पदरीं पडते, हेंच जाणा कोडे
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply