चित्त शांत झोप देई
जर असे क्रोध साधा!
विराट रूपांतर केले
तर शरीरास बाधा!!
राग सुरात गाऊनी केला
तर जन कौतुके हाती!
स्वर दूर तो ठेवूनि गेला
मग खाऊनी जातो माती!!
अर्थ–
स्वभाव हा कोणालाच चुकलेला नाही अगदी देव-देवता ही यातून सुटलेले नाहीत. पण मग देवांस ज्याने काबूत केले त्या क्रोधास मनुष्य कसा काबूत आणेल? मोठाच प्रश्न आहे हा सर्वांसाठीच. अगदी कितीही निरूपण, कीर्तन करणारा बुवा असला तरी त्यालाही राग, क्रोध, प्रेम या भावना असतातच की. कोणत्यातरी एका च काठीला चार ठिकाणी गाठी बांधून त्यातून कुंपण उभे राहू शकत नाही त्यासाठी अनेक काठ्या एकत्र बांधल्या विशिष्ठ प्रकारे समतोल साधला गेला की मग घराला कुंपण घातले जाते आणि माणूस आत निश्चीन्त पणाने राहू शकतो. तसेच आपल्या मनाला, हृदयातील घराला सुद्धा अनेक मोह भूल पाडत असतात पण त्यासाठी घालावे लागणारे कुंपण सुद्धा केवळ एकाच काठीला घेऊन घालता येऊ शकत नाही म्हणून मनाला आवर घालण्यासाठी प्रेम, श्रद्धा, राग, सद्भावना, संस्कार आणि सय्यम या काठ्यांचा समतोल राखून कुंपण घालणे गरजेचे आहे.
ज्याचा क्रोध अफाट, विराट, एका प्रमाणाच्या बाहेर आहे त्याला त्या वादळानंतर उद्धवस्त झालेल्या परिस्थितीलही आवर घालणे हे करावेच लागते. म्हणून राग जेव्हा सुरात गायला जातो तेव्हा समाजात वाहवा होते पण जर तोच राग पट्टी सोडून वाहवत जातो तेव्हा मात्र त्याला आपलं आयुष्य झालेल्या चुका सुधारण्यात घालवावे लागते.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply