खालील प्रसंग हे सद्य: स्थिती/काळामध्ये घडत आहेत असे गृहीत धरून त्यावर माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
चिऊताई चिऊताई दार उघड…….मध्ये कावळे दादा ज्यावेळेस चिऊ ताईच्या घरी येतात व दार उघडण्यास सांगतात त्यावेळेस चिऊताई हि हरातच असते. ती झोपलेलीही नसते. तिच्या मनात आलेले विचार हे खालील प्रमाणे असावेत —
१) चिऊताई हि स्त्री वर्गाची प्रतिनिधी आहे असे समजूया. त्यामुळे आपल्या दारावर एक पुरुष वर्गाचा प्रतिनिधी म्हणून जो कावळेदादा आला आहे, तो खरोखरीच दादा आहे कि दा s s दा आहे?
त्यामुळे तिच्या मनात आलेला विचार हा दादा (भाऊ) आला असेल म्हणून नकारात्मक भावना नक्कीच नसावी. तर तिची भावना हि व्यवध्यानतेची होती. म्हणजेच तिला असे वाटले असावे कि तो दा s s दा (भाई/उपरा) असावा व तिने जर का हे दार उघडले तर तिची काही धडगत नाही. ह्याचे कारण समाजाची सद्य:स्थीती. स्त्री एकटी घरात आहे हे पाहून तिचा गैर फायदा घ्यावा असे तर दारात येणा-या दा s s दा चा तर विचार नाही ना? त्यामुळे तिने प्रथमत: दार उघडले नसावे.
२) दुसरे असे कि ती स्त्री असल्यामुळे – तिची स्त्री सुलभ भावना होती – ती म्हणजे सावधानता. “सावध तो सुखी” या उक्तीला अनुसरून तिने त्यावेळेस दार उघडले नसावे. त्यामध्ये पुरुषाला घरात घेणे हि भावना नक्कीच नव्हती. कारण तिला हे हि माहित होते कि – स्त्री हि कधीही एकटी नसते. तिच्या सोबत नेहमी पुरुषही असतो. कारण हा निसर्गाचा नियम आहे.
स्त्री आहे तेथे पुरुष आहे, नर आहे तेथे मादी आहे, भाऊ आहे तेथे बहीणही असावी लागते, डावा आहे तेथे उजवाहि आहे, खरे आहे तेथे खोटेही आहे, सत आहे तेथे असतहि आहे इत्यादी.
३) तिसरे असे कि पराधीनता. स्त्री हि नेहमी पराधीन म्हणजेच दुस-यावर अवलंबून असते असे मानण्यात येत असते. अशा स्तिथीत ती घरात एकटीच असल्यामुळे म्हणजेच परावलंबी असल्यामुळे पुरुष प्रधान कावळेदादा दारात आले आहेत ते कशावरून हिताच्या गोष्ठी करण्यासाठी आले असावेत? हा विचारही तिच्या मनात डोकावून गेला असावा.
एकंदरीत उपरोल्लेखित – व्यवधानता, सावधानता आणि पराधीनता – या त्रीसुत्रींमुळे तिने त्यावेळेस दार उघडले नसावे.
ह्यावूलट कावळेदादा हे पुरुष प्रधान संस्कृतीचे निदर्शक मानल्यास त्यांनी आपले कर्तव्य पार पाडल्याचेच दिसून येते. त्यांनी पुरुषार्थ धर्म निभावला व स्त्री प्रधान चिऊताईस आपली खरोखरीची ताई असे समजून घरात प्रवेश दिला. इतकेच नव्हे तर दुसरा असाही विचार त्यांच्या मनात आला असावा कि मी जर माझे पुरुषार्थाचे कर्तव्य पार पाडले नाही तर जनमानसात आपली निर्भस्तना होईल आणि जे खरोखरीच पुरुषाच्या जातीला लांच्छन असेल. त्याचबरोबर त्यांच्या मनात असाही विचार चमकून गेला असेल कि स्त्री हि जन्मोजन्मीची माता असल्यामुळे मातेला घरात घेणे हे मला क्रमप्राप्तच आहे. मी जर हे केले नाही तर माझा जन्म हा व्यर्थच होय.
व्यर्थ, निरर्थक पुरुषार्थ करून मी काय मिळविणार? त्यापेक्षा मी माझे कर्तव्य पार पाडतो. आणि त्यामुळे त्यांनी चिऊताईस घरात घेतले असावे. जेणेकरून त्यांना त्यांचे कर्तव्य पार पाडल्याचे समाधान तर मिळालेच व त्याचबरोबर स्त्रीची पुरुषांकडून जी अपेक्षा असते ती हि पुरी करता आली. म्हणजेच पुरुषाने निभावयाचा त्याचा धर्म म्हणजे स्त्री हि मातेसमान आहे असे मानने, स्त्री हि पुरुषाची सहधर्मचारिणी ह्याचे भान ठेवणे, स्त्रीचे पुरुषावर असलेले अवलंबित्व मान्य करणे, स्त्री हि देवीचे रूप आहे ह्याची जान घेणे, स्त्री हे रथाचे दुसरे चाक आहे ह्याची जाणीव आपल्या मनात बाळगणे, स्त्री हि एकाच नाण्याची दुसरी बाजू आहे हे ओळखणे आणि सरतेशेवटी हे हि आपल्या मनात ठसविणे कि स्त्री शिवाय पुरुषाला दुसरा पर्याय नाही.
या संपूर्ण विवेचनावरून असे दिसून येते कि चिऊताइंचा दार न उघडण्याचा निर्णय तर कावळेदादांचा दार उघडण्याचा निर्णय हा आपापल्या परीने योग्यच होता.
इति कथा सफल संपूर्ण………….!!!
— मयूर तोंडवळकर
९१९८६९७०४८८२
Leave a Reply