फुटबॉल मधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील सर्वांत प्रतिभाशाली फुटबॉलपटू आहे. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९८५ रोजी मॅडीइरा, पोर्तुगाल येथे झाला. महान फुटबॉलपटू पेल यांनी रोनाल्डोहला सर्वश्रेष्ठय फुटबॉलपटू संबोधलेले आहे. रोनाल्डोचे वडील जोस डिनिस ऐवियरो अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष रोनाल्ड रीगनमुळे चांगलेच प्रभावीत झाले होते. त्यांच्यापासून प्रेरीत होऊन त्यांरनी मुलाचे नाव‘ख्रिस्तियानो रोनाल्डो डॉस सांतोस ऐवियरो’असे ठेवले होते.पुढे त्याूचे नाव‘ख्रिस्तियानो रोनाल्डो’असे पडले. वयाच्याा १४ व्याड वर्षी रोनाल्डोटने शाळेतील शिक्षकाला बुट आणि खुर्ची फेकून मारली होती. त्यासमुळे त्याळला शाळा सोडावी लागली होती. लहानपणी रोनाल्डो ची आई त्याला ‘रडके बाळ’ असे म्हणत असे. कारण रोनल्डोअ लहानपणी खुप रागीट होता आणि राग आल्या नंतर जोरजोरात रडत होता.
रोनाल्डोने २००२-०३ मध्ये मॅनचेस्टर युनाइटेडला जोडला गेल्यां नतर त्याजने 28 नंबरची जर्सी मागितली हेाती. परंतु नाइलाजास्तेव त्याेला सात नंबरची जर्सी देण्याात आली. आणि पुढे हीच त्यांची ओळख बनली. जॉनी बेरी, जॉर्ज बेस्ट, स्टीव कूपेल, ब्रायन रॉब्सन, एरिक कैंटोना आणि डेविड बेकहम हे सुध्दाे ७ नंबरची जर्सी परिधान करत. जवळपास पाच वर्षांपासून मॉडेल इरिना शायक सोबत क्लोज रिलेशनशिपमध्येु आहे. इरिना सपुर मॉडेल असून तिने २०१४ मध्येय हॉलीवुड फिल्म ‘हरक्यूलिस’मध्येे कामसुध्दा केले आहे. रियल माद्रिद व पोर्तुगालचा स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोने देशातर्फे आणि क्लबतर्फे खेळताना २०१६ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. रोनाल्डोने कारकिर्दीत चॅम्पियन्स लीगचे तिसरे जेतेपद आणि पोर्तुगालसह युरो २०१६ मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर ‘बेलोन डिओर’ पुरस्काराचा मान मिळवला. त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये १२ सामन्यांत १६ गोल नोंदवले. आपल्या समुहाकडून रोनाल्डोला वाढदिवसाच्या शुभेच्छा. रोनाल्डोचे संकेतस्थळ www.cristianoronaldo.com
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply