माझ्यासाठी वणवण करुनही
आई मी तुझ्यावर आज रागावलो
चुकलं माझं आई
मला क्षमा केव्हा करणार आहे? ||१||
मला आठवते,
तुझ्या हाकेने मा़झी रोज सकाळ होई
शाळेत जाताना
न विसरता तू डब्बा देई ||२||
संध्याकाळ होताच क्षणी
रोज माझी वाट पाही
लवकर घरी आलो नाही
तर तुझी चिंता वाढतच जाई ||३||
सगळ्या माझ्या हौस पुरवल्या
चुकत असेल तर मारही दिला
तुझ्यामुळे,आज कुठे ना कुठे
माझ्या आयुष्याचे सार्थक झाले आहे ||४||
सगळं काही माझ्यासाठी करुनही
मी कसे काय रागावलो?
माझ्या हातचे हे पाप
कसे मी फेडणार आहे? ||५||
– कौस्तुभ प्रभु
Leave a Reply