चार कविता सुंदर रचिल्या, काव्य वाचन केले त्याचे
रसिक जनाची स्तुति ऐकूनी, स्वप्न रंगविले कालीदासाचे….१,
कॉलेजातील रंगमंचावरी, तल्लीन होवूनी भूमिका केली
टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली….२,
जमले होते शंभर श्रोते, भाषण ज्यांचे समोर केले
श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी, गांधी नेहरूसम होवूं वाटले…३,
यश जेंव्हां पदरी पडते, भारावूनी जातो आम्ही त्यावेळी
कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन, करीत राहतो चूक सगळी…४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply