च्या भैन .. .. एक बाई माया बायकोवानी दिसत होती
मी तिच्याकडं पाहो ती मायाकडे पाहत होती……..
गाडीले होता वेळ मी पेपरात घुसलो
थोड्या थोड्या टाईमानं वाकून बघत बसलो
मले वाटे शंका बायकोच तर नसन
माझेवर लक्ष ठेव्याले तीच तर आली नसन
च्या…. घाम फुटला जरी पंख्याची हवा होती…..
दोन चार यस्ट्या गेल्या तरी ती नव्हती गेली
तव्हा तं माजी शंका भलतीच वाढत गेली
कधीमंधी मजाक करायचो खरंच का वाटलं असल?
माझ्यामागोमाग पाठलाग करत तर आली नसल
च्या… केवढ्याची आता वेळ आली होती……
बायकोच हाये का मी बघू लागलो निरखून
लुगडं ओळखीच्या रंगांचं,पण कसं समजावं दुरुन
पायातल्या वाहाणा तशाच होत्या तुटल्यास्नी
आता माजा घाम मीच लागलो पुसास्नी
च्या….. असं कसं बायको तं हुशार निघाली होती…
काय करावं,कसं करावं समजत नव्हतं मले
माज्यामांगं का लागली ,मी लागलो थोबाड लपवायले
सरळ रस्ता घरचा पकडून घरीच जावं वाटलं
पण बायकोनं दिलेलं वचन ते महत्वाचं वाटलं
च्या. ती खरी की ही खरी पंचाईत झाली होती…
जरा वेळानं कुणीतरी तिच्याजवळ आला
नजर चुकवुन मी मंग काढता पाय घेतला
जागा बदलून मी दुसरीकडं बसलो गुमान
तरी विचार करत होतो,पारबतीची दुर्ची बहीण तर नसान
च्या…….. सासरच्या नातलगांची कवा ओळख होती?
बस सुटली या बयेच्या पायी
डोकं नव्हतं ठिकाणावर भलत्याच विचारापायी
ती चढली एस्टीत तव्हा बरं वाटलं
भलत्याच शहराच्या बसला जव्हा तीनं गाठलं
च्या ……. या एका तासात मायी ओळख दाखवली होती…
च्या च्या भैन .. एक बाई माया बायकोवानी दिसत होती!
— श्रीकांत पेटकर
Leave a Reply