नवीन लेखन...

सिनेमा बनताना – मौसम

मौसम २९ डिसेंबर १९७५ला प्रदर्शित झाला.तो इंग्रजी कादंबरी The judas tree वर आधारित होता.पटकथा संवाद अर्थातच गुलजार यांचे होते.चित्रपटाला ४ अवार्ड मिळाली होती. best actress शर्मिला टागोर, second best movie,  फिल्म फेअर बेस्ट मुव्ही,बेस्ट डायरेक्टर गुलजार, गुलजार हे बिमल रॉय यांचे सहायक असल्यामुळे त्यांनी ह्या चित्रपटात आर्ट व व्यावसायिक चित्रपटाचा उत्तम मिलाफ साधला आहे.

मौसम व आन्धीचे शुटींग एकाचवेळी सुरु होते. फिल्म जगतात त्यावेळी अशीही चर्चा होती कि गुलजार यांनी शर्मिला टागोरला अश्यासाठी घेतले कारण त्यावेळी राखी व टागोर यांचे सख्य नव्हते. गुलजार यांना लग्नानंतर राखीने चित्रपटात काम करणे नको होते. पण तिने विरोध पत्करून कभी कभी साईन केला होता. त्याचा बदला म्हणून गुलजार यांनी टागोरला घेतले. अर्थात त्यांचा निर्णय किती योग्य होता ते शर्मिला टागोर हिने दाखवून देले, तिने चंदा व कजली हे दोन्ही रोल उत्तम केले आहेत. मुलगी कजली हिची एन्ट्री तर  अंगावर येणारी आहे. जिन्यावरून गिऱ्हाईकांला जिन्यावरून ढकलून देते पाठोपाठ त्याच्या चप्पलही फेकते, तरीही कुठेही बीभत्स किवा ओंगळवाणी नाही. संजीवकुमार तर त्याचा आवडता हिरो.  गुलजार यांनी संजीवकुमारला एका नाटकात 60 वर्षाच्या म्हाताऱ्याची भूमिका करताना पहिले तेव्हा त्याचे वय फक्त २१ होते. म्हणजे तरुण व म्हातारा अश्या दोन्ही भूमिका तो उत्तम करू शकेल याची त्यांना खात्री होती. त्यानेही या भूमिकांच सोने केले आहे. संगीत मदन मोहन यांचे होते. त्यामुळे अर्थातच कर्णमधुर होते. सगळी गाणी लाजवाब.

गुलजार यांच्यावर मिर्झा गालिबचा खूप प्रभाव होता. त्यामुळे त्याच्या एका शेर मधल्या “तसावूरे जाना किये हुये “ यावर त्यांनी “दिल धुंडता है” गाणे रचले. नायक शहरी वातावरणाला कंटाळून  विश्रांतीसाठी हिल  स्टेशनवर जातो जिथे तो फुरसतीचे चार दिवस घालवू शकेल. म्हणून “दिल धुंडता है फुरसतके रातदिन “ ह्या गाण्यासाठी मदन मोहन यांनी वेगळी चाल  रचली होती पण ती गुलजार यांना आवडली नाही. नंतर तीच चाल वीर झारा मध्ये “तेरे लिये” या गाण्यासाठी वापरली आहे. ”मेरी  इश्क के लाखो  झटके “ गाण्याच्या वेळी काही स्टेप शर्मिला टागोरला येत नव्हत्या. त्यावेळी शेजारच्या सेटवर सरोजखान डान्स डायरेक्ट करत होत्या त्यांना गुलजारनी विनंती करून या गाण्याच्या स्टेप बसवायला सांगितल्या. चित्रपटाचे शुटींग चालू असताना १४ जुलै १९७५ला मदन मोहन जग सोडून गेला. त्यामुळे गुलजारनी हा चित्रपट मदन मोहनला अर्पण केला आहे. त्यामुळे पार्श्वसंगीत सलील चौधरी कडून करून घेतले. मदन मोहन हा अश्या काही संगीतकारापैकी आहे ज्यांच्या चित्रपटाची  गाणी ते गेल्यावर हिट झाली. गुलाम मोहमद – पाकिजा, एस.डी.बर्मन –मिली. आर.डी.बर्मन 1942 लव स्टोरी. दुर्दैवाने मदन मोहन मौसमच्या गाण्याच यश पाहायला हयात नव्हता. पण तो तितकाच सुदैवी  होता कि त्याच्या चालीवर अनेक वर्षानंतर चित्रपट आला. वीर झारा.

— रवींद्र शरद वाळिंबे.

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 85 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..