मेरा साया चित्रपट चित्रपट १९६६मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाचे दिग्दर्शक होते राज खोसला. १९६४ साली त्यांचा वोह कौन थी प्रदाशित झाला व तुफान चालला. म्हणून त्यांनी पुन्हा सस्पेन्स चित्रपट काढायचे ठरवले.त्यांना मराठी चित्रपट पाठलाग इतका आवडला होता कि त्यांनी त्याचे राईटस राजा परांजपे कडून विकत घेऊन मेरा साया काढायचे ठरवले. मेरा सायाची पटकथा होती.ग. रा. कामत यांची म्हणजे या चित्रपटात दोन मराठी माणसांचे योगदान होते. एक जयंत देवकुळे लेखक(कथा “आशा परत येते”) व पटकथा ग. रा. कामत. चित्रपटाचा नायक ठाकूर आहे त्याची हवेली हवी म्हणून चित्रपटाचे बहुतेक शुटींग उदेपूर येथे झाले. उदेपुरचा राजवाडा,पिचोला लेक,साहेलीयोकी बाडी येथील शुटींग,सुंदरच, संगीत होते मदन मोहन यांचे त्यामुळे ते अप्रतिम असणे स्वाभाविकच होते.सगळीच गाणी सुन्दर होती.या चित्रपटासाठी मदन मोहन यांना सूर सिंगारचा पुरस्कार मिळाला.
नायिका गीता म्हणजेच साधना गेल्यावर सुनील दत्त एका खुर्चीत बसून फोटोचा अल्बम बघत असतो. त्या अल्बममध्ये लग्नाचे जे फोटो दाखवले आहेत ते शूट झालेच नाही. त्यात साधना दिसते पण सुनील दत्त नाही. कारण शुटींगच्या थोडे दिवस आधी साधनाचे श्री आर.के.नैयर यांच्याशी लग्न झाले होते तेव्हा राज खोसलानी तेच फोटो वापरायचे ठरवले. योगायोग बघा. ”झुमका गिरा रे “ आणि “या डोळ्यांची दोन पाखरे” दोन्ही गाणी आशा भोसले यांनी गायली आहेत. ”या डोळ्यांची दोन पाखरे” हे मराठीतील पहिले haunting गाणे आहे. राजा मेहंदी अलीखान यांनी बरेली शब्द वापरला कारण बरेलीचे झुमके प्रसिद्ध आहेत. या गाण्याच्या वेळी लोकं थेटरात सुटे पैसे उधळत. साधना शास्त्रीय नृत्य शिकलेली नसल्याने डान्स मास्टर सोहनलाल यांनी दाखवलेल्या स्टेप्स तिला जमत नव्हत्या म्हणून त्यांची सहायक सरोजखान यांनी तिच्याकडून सोप्या स्टेप्स बसवून घेतल्या. अपेक्षेप्रमाणे ”वोह कौन थी “ प्रमाणेच मेरा साया सुद्धा भरपूर चालला.
Leave a Reply