नवीन लेखन...

सिनेमा बनताना – पडोसन

 

पडोसन २९ नोव्हेंबर १९६८ रोजी प्रदर्शित झाला.निर्माता होते मेहमूद आणि एन.सी. सिप्पी.मूळ बंगाली चित्रपट पाशेर बरी (१९५२) या चित्रपटाचा रिमेक होता. तेलगु मध्ये त्याचा दोनदा रिमेक झाला. पान्किती अमेयी या नावाने. सगळी कास्टिंग झाली आता गुरूच्या भूमिकेसाठी किशोर कुमारला घ्यायचे ठरले. पण त्याने नकार दिला. त्याचे म्हणणे होते कि मला  त्याच त्याच विनोदी भूमिका करून कंटाळा आलाय. पण शेवटी खूप मिन्नत्वारी केल्यावर तो तयार झाला. मुळात सुनील दत्तची भूमिका आर.डी.बर्मनने करायचे ठरत होते. कारण त्याने मेहमूद बरोबर भूत बंगला मध्ये काम केले होते. पण ते नंतर बारगळले. किशोरकुमारने आपला गेट अप आपला  मामा  धनंजय बनर्जी  सारखा केला. झब्बा, धोतर, मधोमध भांग, तोंडात पानाचा तोबरा, चित्रपट विनोदी होता. हे जगजाहीर आहे. पण याची पटकथा संवाद, आणि गाणी होती राजेंद्र कृष्ण यांची म्हणजे ज्याने “यु हसरतोके दाग मुह्बत मे धो लिये “ किंवा “उनको ये शिकायत है” अशी धीर गंभीर गाणी लिहिले ते. ”मेरी प्यारी बिंदू” गाण्याच्या वेळी डान्स मास्तर आला नाही तेव्हा किशोरकुमारने स्टेप स्वताच बसवल्या. व बाकीच्यांना सांगितले. माझ्या भोवती फेर धरा. ”एक चतुर नार” गाण्याचे रेकोर्डिंग तब्बल १२ तास चालले. कारण किशोरकुमार गाण्यात मधे, मधे आपले शब्द बोलत होता जे आधी ठरले नव्हते. मन्ना डे दोन गोष्टीवर अडून बसले एक मी शास्त्रीय संगीत शिकलेला आहे तेव्हा मी शास्त्रीय संगीत न शिकलेल्या किशोरकुमार कडून हरणार नाही. व “गोडे, एक पे रेहना” असे म्हणून संगीताचा अपमान करणार नाही. यावर महमूद म्हणाला ते शब्द मी म्हणेन. त्यांना इतरांनी समजावले कि मन्नादा,  हिरो जिंकतो म्हणून किशोरकुमार जिंकतो. तुम्ही नाही. वादक सगळ्याच संगीतकाराकडे वाजवतात. त्यापैकी एकाने दुसऱ्या वादकाला हळूच सांगितले “मन्नादाना सांगायला सांग कि बसंत बहार चित्रपटात “केतकी गुलाब जुही “ गाण्यात तुमच्याकडून भीमसेन जोशी सारखे दिग्गज हरले होते कारण तुम्ही हिरोसाठी गात होतात.” पण तशी वेळच आली नाही. सगळ्यात बाप होता तो मेहमूद त्याने मद्रासी हिंदू ब्राह्मणाचे काम इतके सफाईदार केले आहे कि तो मुसलमान हे आपण विसरून जातो. इंडिया टाईम टुडेने २५ ऑलटाईम विनोदी चित्रपटात सामील केले.

 

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 85 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..