नवीन लेखन...

सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक महेश लिमये

सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक महेश लिमये यांचा जन्म १८ जूनला झाला.

मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या महेश लिमये यांचे शिक्षण डोंबिवलीच्या फणसे बाल मंदिर आणि स. वा. जोशी विद्यालयात झाले. त्यांचे आजोबा (आईचे वडील) बॉम्बे फिल्म लॅबमध्ये ‘रसायन तंत्रज्ञ’ म्हणून काम करत होते. त्यांच्या नावाचा दबदबा इतका होता की निवृत्तीनंतरही अनेक ‘सिनेमॅटोग्राफर’ आमचा चित्रपट तुम्हीच करा म्हणून त्यांना सांगायचे. आजोबांचा वारसा महेश यांना मिळाला. महेश लिमये यांनी दहावीनंतर जे. जे. कला महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथून ‘बॅचलर इन फाइन आर्ट’ ही पदवी मिळविली. शेवटच्या वर्षी विशेष अभ्यासाचा विषय म्हणून त्यांनी ‘फोटोग्राफी’ची निवड केली आणि‘पेप्सी कॅन’ हा विषय प्रकल्पासाठी निवडला. विषयाच्या अनुषंगाने स्वत:कडील सर्जनशीलतेचा वापर करून काही वेगळी छायाचित्रे काढली. त्यासाठी पुरस्कारही मिळाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर छायाचित्रकार म्हणून काम करण्यापेक्षा वेगळे काहीतरी करावे, असे त्यांच्या डोक्यात होते. ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून करिअर करता येईल का, असा विचारही डोक्यात घोळत होता. पण पूर्वानुभव आणि यशाची खात्री दोन्ही गोष्टी नव्हत्या. पण आई-वडिलांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांचे वडील म्हणाले, तू कोणतेही क्षेत्र निवड. हरकत नाही. मात्र जे करशील ते निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कर.

सुरुवातीच्या काळात महेश लिमये यांनी आपल्या कलाशिक्षणाचा उपयोग करून चित्र काढणे, भेटकार्ड तयार करून विकणे अशी कामे केली. पुढे निर्माता-दिग्दर्शक शाम रमण्णा यांच्या कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम सुरू केले. छोटय़ा-मोठय़ा जाहिरातींसाठी सर्व प्रकारचे काम केले. अनिल मेहता, विनोद प्रधान, राजा सय्यद, गोपाल शहा अशा नामवंत कॅमेरामन मंडळींचे काम पाहिले. पण तरीही महेश लिमये यांना काही वेगळे करायचे होते. राजा सय्यद यांनी त्यांना एखाद्या सिनेमॅटोग्राफरकडे काम करण्याचा सल्ला दिला. तेव्हा महेश लिमये म्हणाले, ‘या क्षेत्रातील कोणाशीच माझी ओळख नाही. मग तुमच्याकडेच काम करू का?’ पण सय्यद यांच्याकडे आधीच दोन साहाय्यक म्हणून काम करत होते. मला तिसऱ्या माणसाचा पगार परवडणार नाही, असे सय्यद यांनी सांगितले. मग पैसे नसतील तरी चालेल, पण अनुभव आणि संधी मिळायला हवी, या उद्देशाने महेशनी काम सुरू केले. कॅमेरामनचे काम, तांत्रिक बाजू आदींची माहिती आत्मसात केली. ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून आज माझे जे काही स्थान आहे, त्याचे सर्व श्रेय राजा सय्यद यांना असल्याचे महेश लिमये मोठय़ा नम्रतेने सांगतात.

या अनुभवा आधारे महेश लिमये यांनी पुढे लहान-मोठय़ा जाहिरातींसाठी ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून काम सुरू केले. याच दरम्यान २००० मध्ये त्यांचे लग्न झाले. पत्नी क्षमा या उच्चविद्याविभूषित. त्या नोकरी करत होत्या. घर, संसार, नोकरी अशा सर्व आघाडय़ा सांभाळण्यापेक्षा एक काहीतरी करायचे असे ठरवून क्षमा यांनी नोकरी सोडली. जेव्हा आपण कोणीही नसतो आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रात आपल्याला काहीतरी करून दाखवायचे असते तेव्हा कुटुंबाचा पाठिंबा सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो पत्नी, आई-वडील आणि घरच्यांकडून महेश लिमये यांना नेहमीच मिळाला. ‘सहारा’, ‘स्कोडा’,‘कोलगेट’ अशा मोठय़ा कंपन्यांच्या जाहिरातींसाठी महेश लिमये यांनी ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून काम केले.
त्यांचे जे.जे.कॉलेजमधील मित्र मालन यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. एका सायकोथ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन ते करणार होते. त्या चित्रपटासाठी महेश यांनी पहिल्यांदा स्वतंत्रपणे ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून काम केले. दरम्यानच्या काळात निर्माते-दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ‘कॉर्पोरेट’ चित्रपटाची तयारी सुरू केली होती. नवीन ‘सिनेमॅटोग्राफर’ हवा होता. मधुर भांडारकरना महेश लिमये यांचे काम आश्वासक वाटले आाणि महेश लिमये यांना ‘कॉर्पोरेट’ चित्रपट मिळाला. १९९४ ते २००३ अशी नऊ वर्षे साहाय्यक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी पुढे स्वतंत्रपणे कामाला सुरुवात केली.

पुढे मराठीत ‘उत्तरायण’, ‘एवढंसं आभाळ’, ‘नटरंग’, ‘बालक पालक’, ‘बाल गंधर्व’, ‘मुळशी पॅटर्न’ आदी चित्रपट महेश लिमये यांनी केले. सलमान खानच्या ‘दबंग’साठी ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून महेश लिमये यांना खास बोलावून घेण्यात आले. हिंदीतील ‘बिग बजेट’ आणि ‘१५० कोटी’ क्लबमध्ये गेलेला एक मोठा चित्रपट त्यांच्या नावावर जमा झाला. पुढे त्यांनी ‘दबंग २’साठी ही काम केले. ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘कॉर्पोरेट’, ‘हीरोईन’, ‘दबंग’, ‘दबंग २’ हे त्यांचे हिंदीतील गाजलेले चित्रपट होत. विशेष मुलांवर आधारित ‘यलो’ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून काम करत हे वेगळे आणि नवे आव्हानही महेश लिमये यांनी स्वीकारले. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.तसेच ४९ व्या राज्य चित्रपट पुरस्कारात महेश लिमये यांना बालगंधर्व या चित्रपटासाठी उत्कृष्ट छायालेखना साठी पुरस्कार मिळाला होता.

‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या ऐतिहासिक चित्रपटांतील साहसदृश्ये महेश यांनी चित्रित केली आणि त्यांच्या नावाचा दबदबा आणखी वाढला.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..