नवीन लेखन...

अभिजात वास्तुशिल्पकार लॉरी बेकर

वास्तुशिल्पकार लॉरी बेकर यांचा जन्म २ मार्च १९१७ रोजी इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम येथे झाला.

सामगीचा अतिशय काटकसरीने वापर करत अल्पखर्ची व पर्यावरण संवादी घरांची निर्मिती करणारे श्रेष्ठ वास्तुशिल्पी लॉरेन्स चार्ल्स ऊर्फ लॉरी बेकर अशी त्यांची ओळख होती.

‘क्वेकर’ या खिश्चन धर्मातील उदारमतवादी चळवळीचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता. धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसाचाराचा त्यांना मनापासून तिटकारा होता. १९३७ साली बर्मींगहम स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधून त्यांनी वास्तुविशारद ही पदवी प्राप्त केली होती. १९३९ साली चीन व जपान यांच्या युद्धात हजारो सैनिक जखमी झाले होते. रेडक्रॉस संघटनेला तिथे जाण्यास मज्जाव होता. क्वेकर नी शुश्रूषा पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. मलमपट्टी करणे व भूल देण्याचे प्रशिक्षण घेऊन लॉरी बेकर चीनमध्ये गेले. शस्त्रक्रिया करण्यास मदत करू लागले. तीन वर्षे ते अहोरात्र सैनिकांच्या सेवेत हजर होते. परत इंग्लडला जाताना त्यांना भारतातून जहाज घ्यायचे होते. १९४३ च्या सुमारास इंग्लंडला परतीचा प्रवास करण्यासाठी बेकरजी मुंबईला आले आणि त्यांची परतीची बोट ३ महिने लांबली. मुंबईत त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली. हा तरुण बिटिशांच्या शुश्रूषेकरिता स्वतःचा व्यवसाय बाजूला टाकून मायदेश सोडून तीन वर्षे राहतो याचे गांधींना विलक्षण कौतुक वाटले . पहिल्याच भेटीत दोघे कमालीचे जवळ आले. गांधीजींच्या सांगण्यावरून बेकर गाव, वाडया वस्त्या पाहून आले. ते परत निघत असताना गांधीजी म्हणाले “अहो तुमची खरी गरज इकडे आहे. तिकडे सगळे काही मुबलक आहे. काही उपलब्ध नसताना निर्मीतीचे आव्हान इकडे पावलोपावली आहे . दरम्यानच्या काळात त्यांची डॉ. एलिझाबेथ यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर बेकर आपल्या मायदेशी गेले ते केवळ निरोप घेण्यासाठीच, १९४८ साली बेकर भारतात कायम स्वरूपी वास्तव्याकरिता आले. महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून आणि हिमाचलमधल्या दुर्गम भागातल्या अनुभवांतून त्यांनी बांधकामासाठी जास्तीतजास्त स्थानिक सामग्री वापरण्याचा नियमच घालून दिला होता. परिसराशी एकरूप होऊ शकणारे स्वस्त आणि सुंदर असे ‘वास्तुशिल्पकलेचे शाश्वत’ नमुने निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. १९५० नंतरच्या काळात त्यांनी पर्जन्यजलसंवर्धन (रेन वॉटर हार्वेस्टिंग), ऊर्जाबचत आणि बांधकामाच्या ठिकाणी निसर्गाचे कमीतकमी नुकसान होईल अशा प्रकारच्या कल्पना प्रत्यक्षात आणल्या. लॉरी बेकर ५० हून अधिक वर्षे भारतातच वास्तव्य करून त्यांनी वास्तुकलांचे अद्भुत नमुने सादर केले. ‘सेंटर फॉर सायन्स टेक्नॉलॉजी फॉर रुरल डेव्हलपमेंट’चे संचालक म्हणून त्यांनी कार्य केले.

सामान्य माणसाला किफायतशीर घर उपलब्ध करून देणे आणि ते तितकेच सुंदर आणि मजबूत व्हावे यासाठी त्यांचा प्रयत्न होता. पर्फोरेटेड ब्रिक स्क्रीन, पिरॅमिड स्ट्रक्चर ही त्यांच्या वास्तुकलेची वैशिष्ट्ये होत. घसरते छत आणि टेराकोटा मंगलोर टाइल्स, वर्तुळाकार भिंती आणि सोबतीला उंचीवर व्हेन्ट (हवा खेळती राहण्यासाठी भिंतीत राखलेली छिद्रे) असे अनेक प्रयोग त्यांनी वास्तुनिर्मितीत केले; ज्यांमुळे उष्णता कमी करता येईल. ‘चित्रलेखा फिल्म स्टुडिओ’ आकुलम, ‘लिटरसी व्हिलेज’ लखनौ, ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज’ त्रिवेंद्रम, ‘द इंडिअन कॉफी हाउस’ त्रिवेंद्रम, ‘साकोन’ कोइम्बतूर अशा वास्तू बेकर यांनी निर्माण केल्या.

‘पद्मश्री’ आणि ‘मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ अशा पुरस्कारांनी बेकर यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या ठायी असलेला सामाजिक दृष्टिकोन, सामग्रीचा सुयोग्य आणि प्रामाणिक वापर, वास्तुमधला साधेपणा आणि अहिंसेवर असलेला ठाम विश्वास यांमुळे त्यांना ‘वास्तुकलेमधील गांधी’ म्हटले गेले.

लॉरी बेकर यांचे १ एप्रिल २००७ रोजी निधन झाले.

अतुल देऊळगावकर यांनी लॉरी बेकर यांच्या वर ‘लॉरी बेकरः ट्रुथ इन आर्किटेक्चर’ हे पुस्तक लिहिले आहे. आज २ मार्च २०२१ रोजी त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अतुल देऊळगावकर लिखित ‘लॉरी बेकर- निसर्गसंवादी अभिजात वास्तुकला’ ही त्यांच्यावरील पुस्तकाची सातवी व सुधारीत आवृती प्रसिद्ध होणार आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..