नवीन लेखन...

शास्त्रीय संगीत मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वोत्तम

(भारतरत्न लता दीदींना शब्दांजली)

भारतरत्न लता दीदींच्या ९२ वर्षांच्या आयुष्यात त्यांच्या प्रगतीचा आलेख कायम उंचावतच गेल्याचे दिसते. साक्षात श्रीसरस्वती मातेच्या कृपाशीर्वादाने पावन झालेले त्यांचे जीवन उतरोत्तर फुलत गेलं, त्यांचा सांगीतिक प्रवास खुलत गेला. स्वर्गातील देवादिकांच्या निमंत्रणाचा सन्मानपूर्वक आदर करून गानकोकिळा स्वर्गवासियांना मंत्रमुग्ध करण्यासाठी मार्गस्थ झाल्या, तेही ह्या जगातील सर्वांसाठी त्यांच्या हजोरो गायनाच्या साठवणींचा आणि त्यांच्या सुरेल आवाजाच्या आठवणींचा खजिना खुला करून. त्यांना वाहिलेली ही शब्दांजली…..

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात रागांच्या विशिष्ट वेळा सांगितल्या असल्याचं आपल्याला ज्ञात आहेच. त्या विशिष्ट वेळी तो राग गायल्यास त्याचा मनावर तसंच शरीरावर अनुकूल परिणाम होत असतो. आयुर्वेदातही शरीरातील वात, पित्त, आणि कफ ह्या तीन दोषांच्या दिवस आणि रात्रींच्या वेळांचं वर्णन केलेलं आढळतं. मनाच्या निर्माण होणा-या विविध अवस्थाही ह्या तीन दोषांमुळे निर्माण होत असतात. त्यांमध्ये वातामुळे मन चंचल, पित्तामुळे क्रोध निर्माण होतो आणि कफामुळे आळस वाढतो. अशा रीतीनं मनाच्या अवस्थांचेही ह्या तीन दोषांप्रमाणे वर्गीकरण करता येऊ शकतं. त्यामुळे दिवसा आणि रात्री ह्या तीनही दोषांची वेळ आणि त्या विशिष्ट वेळेचा राग ह्यांचाही संबंध एकमेकांशी असणं आवश्यक असल्याचं आपल्या लक्षांत येईल. कारण, शास्त्रीय संगीत आणि आयुर्वेद ही दोन्ही मूलतः भारतीय शास्त्रं असल्याचं आपल्याला माहिती आहे. आयुर्वेदीय संगीतोपचार ही अभिनव संकल्पना अशा रीतीने या दोन्ही शास्त्रांचा योग्य मेळ घालून पूरक आयुर्वेदीय संगीतोपचार ही अभिनव संकल्पना उदयाला आल्याचं समजतं. हा उपचार अन्य उपचारांना पूरक असल्याचंही म्हंटलं जातं. आयुर्वेदीय शास्त्रांची त्याला जोड आहे आणि संगीताचा त्यामध्ये उपयोग केल्यानं तो पूरक आयुर्वेदीय संगीतोपचार आहे. ह्या पूरक उपचारांचा उपयोग आपल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी, स्वास्थ्यासाठी व्हावा, हा मूळ उद्देश लक्षात घेणं आवश्यक आहे. अगदी मानसोपचार तज्ज्ञांनाही या उपचारांचा उपयोग करून घेता येईल, जसजशी ही संकल्पना विकसित होईल व्यवहारात येईल तसतशी त्या तज्ज्ञांकडून भरही टाकली जाईल, हेही तितकंच खरं आहे.

केवळ मनुष्य प्राणीच नाही, तर पशुपक्षी देखील संगीताचा आनंद घेतात असं निदर्शनास आलं आहे. संगीताच्या श्रवणानं वनस्पतीची देखील वाढ जलद आणि अधिक होऊ शकते, असं निसर्ग शास्त्रीय प्रयोगाद्वारे सिद्ध झालं आहे. संगीत मनाला शांती मिळते, मनाला प्रसन्न करण्याचं काम संगीतामुळे होत असतं. पूर्वी घंटानादापासून रोगमुक्ती या संकल्पनेचा विकास झाला होतो. आजच्या काळामध्ये ताणतणावाचं निवारण करण्यासाठी संगीताला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.

आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या संगीत महत्वाचं असल्याचं आपण समजून घेतलं पाहिजे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटं संगीत ऐकल्याने आपण व्याधीमुक्त होऊ शकतो. शांत झोप लागू शकते, झोपेमध्ये शारीरिकच आणि मानसिक शांततेची तसेच विश्रांतीची देखील जरुरी असते.

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..