आज प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचा जन्म १ जुलै १९६६ रोजी झाला.
रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक राशिद खान यांचा गायनाचा प्रवास लहानपणी सुरू झाला. १९७७ साली म्हणजे ११ व्या वर्षी त्यांनी पहिली अदाकारी पेश केली. १९७९ साली नवी दिल्लीत त्यांनी आयटीसी संगीत संमेलनात कला सादर केली. त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही.
विविध मैफली, सांगितिक कार्यक्रमातून देशपरदेशात त्यांचे सूर गुंजत राहिले. हिंदुस्थानी शास्त्रीय गायन प्रकार हा जगातील सर्वात जुना आणि पारंपरिक असा गायनाचा प्रकार आहे. शब्द व सुरावरची हुकूमत, आवाजातील लहेजा, तालबद्धता आणि घोटून केलेला रियाझ, या संपत्तीवर भारतीय कलाकार अनादी काळापासून शास्त्रीय गायनाच्या वैभवाला उत्तरोत्तर झळाळी देत आले आहेत. याच मुशीत घडलेल्या राशिद खान हे रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक आहेत. शास्त्रीय गायनाला जगभरात नावलौकिक मिळवून देण्यास मोलाचे योगदान देण्यात राशिद खान यांचा मोठा हात आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=fNfIhUcRzvI
Leave a Reply