(नारळीपौर्णिमेनिमित्त बालकाव्य)
(चाल : बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना)
देवाची करणी , नारळांत पाणी
आगळेंच असलें दुसरें पाहीलें फळ ना कोणी ।।
नारळाला पाहुन्
करीं फळाला पकडुन्
आश्चर्यचकीत होती
सगळे, गुण याचे ऐकुन् ।
सगळे, गुण याचे ऐकुन् ।
दगडासम हा बाहेरुन्
पण अति-मृदु असतो आतुन्
म्हणुनच कां पसंत केलें
नर-वानर-देवांनी ?
नर-वानर-देवांनी ?
नारळा श्रीफळ म्हणती
अतिशय पवित्र गणती
देवाची आरती होतां
त्याचा प्रसाद वाटती ।
त्याचा प्रसाद वाटती ।
नारळात गोड पाणी
खोबरेंही साखरेवाणी
तृप्ती, संतोष मिळती
सेवन दोहोंचें करुनी ।।
सेवन दोहोंचें करुनी ।।
नारळ आणीन मी
शेंडी काढीन मी
नैवेद्य दाखवूनी
सर्वां देईन मी ।
सर्वां देईन मी ।
चवीनें खोबरें खाइन्
अमृतसम पाणी पीइन्
वाखाणिन निसर्गाच्या
चमत्काराची करणी ।।
चमत्काराची करणी ।।
– – –
— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
Leave a Reply