इंग्रजीप्रमाणेच मराठी पुस्तकेही ऑनलाइन उपलब्ध होऊ लागली आहेत. यामध्ये ऑनलाइन शॉपिंगपासून ते ऑनलाइन रिंडींगपर्यतच्या सर्व सोयी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अनेक प्रकाशकांनी त्यांच्या वेबसाईटस बनवून त्यावर आपल्या पुस्तकांची माहिती ठेवली आहे. काही संस्थांनी आता मोफत इ-बुक्स वगैरे द्यायला सुरुवात केली आहे.
मात्र संपूर्ण पुस्तक किंवा कादंबरी पूर्णपणे मोफत वाचनासाठी ठेवणं हे अजूनही मराठीत तेवढं रुळलेलं नाही.
आपल्याला कादंबरी वाचनात रस असेल तर www.marathinovels.net या साइटला भेट द्या. या साइटवर काही मराठी कांदबर्या याचबरोबर त्यांचे इंग्रजी व्हर्जन्सही उपलब्ध आहेत. यामध्ये आपण कादंबरीचे प्रकरणांनुसार वाचन करु शकतो.
ही साईट बनविणारे श्री सुनिल डोईफोडे हे पुणे येथील रहिवासी असून ते M.Tech आहेत. ते संरक्षण मंत्रालयाच्या DRDO या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी बर्याच कादंबर्या तसेच कथा लिहिल्या आहेत.
या वेबसाईटची संकल्पना चांगली आहे मात्र ही वेबसाईट जरा जास्त आकर्षक करता आली असती. सर्वसाधारणपणे एखाद्या साईटपेक्षा याला ब्लॉगचे स्वरुप आलेले दिसते.
— पूजा निनाद प्रधान
vijaykumar.kumbhar333@gmail.com