बॉलीवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता देवेन वर्मा यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म २२ आक्टोबर १९३७ रोजी झाला
देवेन वर्मा यांनी अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका अतिशय खूबीने वठवल्या होत्या.
हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अंगूर’, ‘खट्टामिठा’ या चित्रपटांमधील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. विनोदाचे टायमिंग साधण्यात हातखंडा असलेल्या देवेन यांना ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘अंगूर’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले होते.
देवेन वर्मा यांनी १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. चमत्कार, जुदाई, इश्क, चोर के घर चोर, अंगुर, खट्टा-मीठा, कोरा कागज, चोरी मेरा काम यातील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ‘दोस्त असावा तर असा’, ‘हा खेळ सावल्यांचा’ या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते.
त्यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु करत काही चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले होते.
देवेन वर्मा यांचे २ डिसेंबर २०१४ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply