गेल्या शतकातली अमेरिकेची अत्यंत लोकप्रिय कॉमेडी स्टार ल्युसिल बॉलचा जन्म ६ ऑगस्ट १९११ रोजी न्यूयॉर्क येथे झाला.
सुरुवातीची काही वर्षं रंगभूमीवर धडपड केल्यानंतर ल्युसिल बॉलला रोमन स्कॅन्डल्स, ब्लड मनी, किड मिलियन्स असे चित्रपट मिळाले. १९४० सालच्या ‘टू मेनी गर्ल्स’मध्ये ती डेझी आर्नेझबरोबर चमकली आणि त्यांनी लग्नही केलं. ऑक्टोबर १९५१ पासून पुढची सहा वर्षं त्यांची ‘आय लव्ह ल्युसी’ ही टेलिव्हिजन सीरियल दणक्यात चालली आणि ल्युसी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
तिच्यातल्या कॉमेडीच्या लाजवाब टायमिंगने लोकांवर भुरळ पडली. पुढे तिने डेझी आर्नेझशी घटस्फोट झाल्यावरही दी ल्युसी शो (१९६२-६८) आणि हिअर इज ल्युसी (१९६८-७४) या मालिका केल्या आणि ती लोकप्रियतेच्या शिखरावरच राहिली. तिला एकदा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला होता. १३ वेळा प्राइमटाइम एमी पुरस्कारांचं नामांकन तिला मिळालं होतं आणि चार वेळा तो पुरस्कार मिळाला होता.
तिने प्रतिष्ठेचा क्रिस्टल पुरस्कारही मिळवला होता. ल्युसिल बॉलचे २६ एप्रिल १९८९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply