२७ डिसेंबर १९११ रोजी जन-गण-मन हे गीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कलकत्ता येथील कार्यक्रमात सर्वात पहिल्यांदा गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत रचलेले हे गीत भारताचे राष्ट्रगीत होईल असे त्यावेळी कोणाला वाटले ही नसेल.
२४ जानेवारी १९५० रोजी ते राष्ट्रगीत म्हणून जाहीर करण्यात आले.
या गीताची पाच कडवी असून ती म्हणण्यास वेळ लागतो, यामुळे केवळ पहिलेच कडवे सबंध भारतात म्हटले जाते. पाचही कडव्यांच्या राष्ट्रगीताचे संकलन भारतीय संस्कृतिकोश खंड-८ यामध्ये प्रामुख्याने आढळते.
जन गण मन पूर्ण गीत
जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||
अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे
प्रेमहार हय गाथा
जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||
पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री
तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री
दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे
संकंट दुखयात्रा
जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||
घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
दु:स्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके
स्नेहमयी तुमी माता
जनगण दु:ख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||
रात्र प्रभातिल उदिल रविच्छवि पुर्व उदयगिरि भाले
गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले
तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे
तव चरणे नत माथा
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||
— संकलन.संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply