नवीन लेखन...

जन्मजात हृदरोग

खरे पाहिले असता हृदय हा एक स्पंदक (पंप) नसून एका आवरणांमध्ये गुंडाळलेला डावा व उजवा असे दोन स्पंदक आहेत.

ते एका पडद्याने विभागलेले असतात त्यामुळे त्यातील रक्त एकमेकांत मिसळत नाही. या प्रत्येक स्पंदकामध्ये दोन कप्पे असतात. डावा स्पंदक शरीरामध्ये शुद्ध रक्त पसरतो व सर्व अवयवांना रक्ताद्वारे प्राणवायू व इतर पोषक द्रव्ये पुरवितो. उजवा स्पंदक सर्व शरीरातून आलेले अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी फुप्फुसाकडे पाठवितो. फुप्फुसांमध्ये प्राणवायू व कार्बनडायॉक्साइड या वायूंची अदलाबदल होऊन रक्त परत शुद्ध बनते आणि हृदयाच्या डाव्या कप्प्यांत परत येते.

याप्रमाणे रक्ताभिसरण एकाच दिशेने चालू ठेवण्यासाठी दोन कप्प्यांमध्ये एक झडप असते. ती फक्त एकाच दिशेने उघडते. ज्या वेळी हृदयविकार अर्भकाच्या जन्मापासून असतो त्या वेळी त्यास ‘जन्मजात रोग’ म्हणतात. यात डाव्या व उजव्या कप्प्यांना विभागणाऱ्या पडद्यांतील छिद्र, रक्तवाहिन्यांची चुकीची जोडणी, चिकटलेल्या झडपा किंवा तत्सम रोगांचा समावेश होतो. ‘निळसर अर्भक’ ब्ल्यू बेबी हा याच रोगाचा एक प्रकार होय, तसेच वारंवार सर्दी होणे, शरीराची वाढ खुंटणे वगैरे लक्षणेही दिसतात. यात जवळजवळ सर्व रुग्णामध्ये औषधोपचार व निरनिराळ्या शस्त्रक्रियांद्वारे हृदयाची कार्यक्षमता पूर्ववत केली जाते. आता तर शस्त्रक्रियेशिवाय अगदी लहान अर्भकातही ही छिद्रे बंद केली जातात. जर नाडीचा वेग कमी असेल तर पेसमेकरच्या मदतीने तो वाढविता येतो आणि शेवटचा उपाय म्हणून हृदयरोपणही करता येते. अशा तऱ्हेने लहान मुलांना पुढील आयुष्य चांगल्या तऱ्हेने जगणे शक्य होते.

-डॉ. पुरुषोत्तम अ. काळे
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..