पूर्वी असे म्हटले जात असे इतका पैसा त्याच्याकडे आहे सात पिढ्या पुरेल..? नीट पाहिले तर भ्रष्ट्राचार करून केलेला पैसा तिसऱ्या पिढीपर्यंतच पोहचतो आणि मग जी उतरती कळा लागते म्हणजे त्याची त्या माणसाची ओळखच नष्ट होऊ पहाते , मग तो कुठल्याही क्षेत्रातला असो.
आज कोरोनाच्या काळात माणसाला एक कळले की आपल्याला खरा पैसा किती लागतो जगण्यासाठी. आज अनेक जणांचे वरचे इनकम बंद आहे . ते अस्वस्थ आहेतच , तसेच पुढ़े लोक जर बेकारीपणाने पिसाळले तर काही खरे नाही . त्यामुळे वेळीच कळले तर बरे.
कितीही मोठा माणूस असो त्याला आज समाजापुढे हात पसरायला मजबूर केले आहे कारण देश त्यांना चालवायचा आहे. तर सामान्य हातावर ज्याचे पोट आहे त्यालाही विवंचना आहे , आज किंवा उद्या खायला काय मिळणार. ? मोठमोठे डॉक्टर्स ,राजकारणी, सरकारी कर्मचारी , सामान्य माणूस सगळीकडे हवालदिल झाला आहे. सगळ्यांचीच गुर्मी पार कमी झाली आहे, विझली नाही. ती विझणारही नाही ? मी अशी कित्येक घरे पाहिली त्यांचा पैसा तिसऱ्या पिढी पर्यंत पुरतो मग त्याला , त्याच्या नावाला उतरती कळा लागते . हळूहळू तो त्याचे एम्पायर लुप्तच होऊ लागते, हातात पैसे अवेळी आल्यामुळे पुढल्या पिढ्या बेभान होतात , ड्रग्स, हुक्का आणि तत्सम गोष्टीत स्वतःला आणि स्वतःच्या खानदानाला संपवण्याचा कार्यक्रम सुरु होतो. तर काही मंडळी आधीच सावध होतात, आपला दोन नंबरचा गाशा गुंडाळतात. जे नाही गुंडाळत त्याचे मग ‘ कल्याणच ‘ होते.
सत्ता आणि गुर्मी ह्या अशा दोन गोष्टी आहेत त्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात कुणाचीही सरशी झाली तरी सत्यानाश आणि फ्रस्ट्रेटशन आहेच आहे.खरेच या कालखंडातून काही शिकतील , सुधारतील का ? कठीण प्रश्न आहे. पण आपण काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करणे आवश्यक आहे ही भावना निर्माण झाली तर काहीतरी वेगळे घडेल कारण आपल्या सत्तेचा माज , त्याचा फोलपणा ह्या दोन्ही गोष्टी स्वतःल समजून घेता येईल.
अमुक एक साहेब माझ्या ओळखीचा आहे आपली सेटिंग आहे असे म्हणणारी पिढी समाजात आहे. अरे तू जे पैसे फेकतोस ना म्हणून तो तुझा आहे. अरे पण पैसे फेकण्याची वेळ का येते, असे विचारले तो म्हणतो काय राव एखादा धंदा करून बघा नुसते हॉटेल काढा अनेक जण सदिच्छा भेट घेतात. अगदी वरपासून . स्वतःचे घर बाधायला घेतले, बिल्डिंग बांधायला घ्या ह्या सर्वांच्या सदिच्छा भेटी सुरु होतात .त्याच्या म्हणणे खोटे नाही. भ्रष्ट्राचार आणि त्यातून येणारी गुर्मी आणि त्याला मिळणारा पाठींबा. त्या सर्वानी गृहिणींनी , मुलांनी विचार करा हीच विचार करण्याची वेळ आहे कारण आता तुमच्याकडे त्यासाठी बराच वेळ आहे, त्या कोरोनामुळे .पण सदिच्छा भेट घेणारे वाढले आहेत.
त्यांना सुधारू शकते ती त्यांची मुले आणि त्यांच्या गृहिणी . कारण स्त्रीमध्ये अनेक गोष्टी अशा असतात भल्याभल्याना जेरीस आणतात वठणीवर आणतात. घरची स्त्री जागरूक असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांनी ह्या ‘ सदिच्छा ‘ वाल्याना ठणकावले तर ? असा विचार मांडला आहे पटला तर बघा. तुम्ही नको त्या मार्गाने कमावलेला पैसा खरेच तुमचा घात करेल का उत्तम पिढी निर्माण करेल याचा विचार करा.
तुमचे पद मग ते कितीही मोठे असो पण ते पद काही मायक्रॉन विषाणू वाट लावू शकतो हे लक्षात घ्या. आपल्या पुढल्या पिढ्यासाठी तर थांबा असे संगितले पाहिजे, नाहीतर तिसऱ्या पिढीत किंवा त्यानंतर सत्यानाश निश्चित , विचार करा ?
सतीश चाफेकर
Leave a Reply