नवीन लेखन...

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सागरी सुरक्षेची समिक्षा

मुरुड तालुक्यातील आठ जण संशयास्पदरीत्या फिरताना ०८ /०८ /२०१५ ला आढळून आले आहेत. हे सर्व जणवेळास्ते, वावडुंगी आणि सायगाव परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आले आहे. याबाबत जिल्ह्य़ात सर्वत्र नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रायगड जिल्ह्य़ातील समुद्र किनाऱ्यांवर गेल्या आठवडय़ापासून ज्वालाग्रही रसायनांनी भरलेली पिंपे वाहून येत होती. गेल्या आठवड्यात अशा प्रकारची ५३ पिंपे आणि पाच कॅन अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यांवर आढळून आले. या पिंपांचा ठावठिकाणा लागलेला नसतानाच आता मुरुड तालुक्यात आठ ते दहा जण संशयास्पदरित्या वावरत असल्याचे आढळून आले आहेत. हे सर्वजण दहशतवादी असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने १०९३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.रायगड समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेले रसायनयुक्त पिंप आणि त्यानंतर मुरुड परिसरात आढळलेले आठ बंदूकधारी संशयित यांचे गूढ अद्यापही उकलले नाही. मात्र या दोन्ही घटनांमुळे येथील सागरी सुरक्षेतील त्रुटी उघड झाल्या आहेत.नौदलाचे रडारवर रसायनांनी भरलेली पिंपे अथवा तत्सम वस्तू दिसून येत नाही.हवाई गस्तीदरम्यान ही पिंपे दिसल्या तरी समुद्रात पडलेल्या कचऱ्याप्रमाणे दिसतात. त्यामुळे किनाऱ्यावर आल्याशिवाय या वस्तू काय आहेत हे कळत नाही असे नौदलाने सांगितले.

६९ बोटींपैकी २३ बोटी नादुरुस्त
याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर दहशतवाद्यांकडून घातपाती कारवायांची शक्यता गुप्तचर यंत्रणाकडून व्यक्त केली जात असतानाच किनारपट्टीवरील सुरक्षेबाबत अद्यापही फारशी सजगता बाळगली जात नाही. किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी आवश्यक असलेल्या ६९ बोटींपैकी २३ बोटी नादुरुस्त आहे. यात ११४ किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेल्या मुंबईतील २० पैकी १४ बोटींचा समावेश आहे.

पावसाळ्यात सागरी गस्त बंद असते. अधिकाधिक बोटी नादुरुस्त होतात आणि जेव्हा गस्त सुरू होते तेव्हा बोटी उपलब्ध नसतात.
सागरी सुरक्षेसाठी पोलिसांना तटरक्षक दलामार्फत प्रशिक्षण दिले जात असून आजवर नऊ वर्षांत ५६ तुकडय़ांमध्ये केवळ एक हजार ४११ पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वेगवान बोटी चालविण्यासाठी एक हजार चार पदे मंजूर असली तरी प्रत्यक्षात ४०९ पदेच भरण्यात आली आहेत. उर्वरित भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ११ महिन्यांच्या कंत्राटाने घेतलेल्या खासगी ‘सेकंड क्लास मास्टर’ (६३) आणि ‘फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हर’ (३५) यांच्यावर सागरी सुरक्षेची जबाबदारी आहे.

काही महत्वाच्या घटना
निर्मनुष्य जेट्टी, बेटे तसेच खाडीच्या परिसरात फिरती गस्त पुरेशी नाही.सागरी पोलीस ठाणे एक हे माहीम फिशरमेन कॉलनीतून कार्यरत आहे.सागरी पोलीस ठाणे दोनसाठी अक्सा चौपाटीवर जागा न मिळाल्याने बोरिवली पश्चिमेतील योगी नगर वसाहतीतून तात्पुरते काम सुरू आहे. सागरी सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांना केंद्राने तीन तर राज्य शासनाने २३ जलद नौका पुरवल्या आहेत. या नौकांद्वारे यलोगेट आणि सागरी पोलीस ठाण्यांतील अपुऱ्या पोलिसांमार्फत गस्त सुरू आहे.दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेऊन २६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्रकिनारी ७० तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.

१७ मे २०१५ला समुद्रात नौदलाच्या बोटीवरून खोल समुद्रामध्ये ओएनजीसी प्लॅटफॉर्म जवळ गोळीबारात सुशांत लुजी (२४) हा खलाशी जखमी झाला. ९ मेला सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आयएनएस सरदार पटेल हा नाविक तळ गुजरात पोरबंदर येथे कार्यान्वित झाला. मे च्या पहिल्या आठवड्यात ६०० कोटी रुपयांचे अफू, गांजा आणि चरस घेऊन येणारी एक पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत भारतीय कोस्टगार्डने एका ऑपरेशनमध्ये पकडली.

रक्षण क्षेपणास्त्र फायरपासून
तेहेरिके तालिबान या पाकिस्तानी दहशतवादी गटाने स्वत:चे क्षेपणास्त्र बनवले आहे. याविषयीचा व्हिडीओही जारी करण्यात आलेला आहे. पाकिस्तानी दहशतवादी गट समुद्राच्या बाजूने येऊन समुद्र किनार्याजवळ असलेल्या टार्गेटवर किंवा समुद्राच्या आत असलेली टार्गेटस् वर जसे की बॉम्बे हाय यांचे तेल प्लॅट फॉर्म किंवा तेल घेऊन जाणार्या पाईपलाईन्सवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करू शकतील का ?

आज आपल्या किनार्यावर १२ मोठी आणि २०० छोटी बंदरे आहेत. मोठ्या बंदरांचे रक्षण बर्यापैकी केले जाते, पण छोट्या बंदरांचे रक्षण वाढवण्याची नक्कीच गरज आहे. समुद्रकिनार्यावर अनेक ठिकाणी स्पेशल इकोनॉमिक झोन आहेत.त्यांची सुरक्षा मजबुत करायची गरज आहे.

आपल्या बहुतेक रिफायनरीज़् या समुद्र किनार्यावर आहेत. याशिवाय अणुशक्तीने वीज तयार करणारी केंद्र ही तारापूर, जैतपूर अशा ठिकाणी आहेत. या सगळ्यांचे संरक्षण दहशतवादी संघटनांनी केलेल्या क्षेपणास्त्र फायरपासून अणुभट्टी,रिफायनरीज़्,मोठ्या कारखान्यांचे रक्षण आपण कसे करू शकतो?.

तस्करी कशी थांबवता येईल
समुद्रामधून तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. माध्यमात आलेल्या बातम्यांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर डिझेल खोटया नोटा, अफू, गांजा, चरस, सोने आणि चांदी तसेच इतर अनेक गोष्टींची तस्करी केली गेलेली आहे.

माओवाद्यांना अॅम्युनिशन आणि हत्यारे ही आंध्रप्रदेश किनार पट्टीकडून दिले जात असावेत. बांगलादेशी हे समुद्रमार्गाने सुंदरबन,ओरिसा आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर घुसखोरी करत आहेत.तामिळनाडमधल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये पकडण्यात आलेले दहशतवादी हे समुद्राकडून श्रीलंकेच्या बाजूने भारताच्या किनार्याकडून तामिळनाडूमध्ये आलेले होते. समुद्राकडून होणारी ही घुसखोरी आपण का थांबवु शकत नाही?

समुद्राकडून रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची ?
सुरक्षेची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी ही भारतीय नौदल, कोस्टगार्ड, पोलीस, कस्टमडिपार्टमेंट आणि वेगवेगळ्या गुप्तहेर संस्था यांची आहे. सध्या किनार्यापासून १२ नॉटीकल माईलपर्यंत जबाबदारी ही पोलीसांची , १२ नॉटीकल माईल पासून २०० नॉटीकल माईलपर्यंतची जबाबदारी कोस्टगार्डची आणि २०० नॉटीकल माईलच्या पुढे जबाबदारी ही भारतीय नौदलाची आहे. २६/११ च्या तुलनेमध्ये कोस्टगार्डचे सामर्थ आता बर्यापैकी वाढलेले आहे. त्यांच्याकडे ८० पेट्रोलिंग/टेहाळणी करणार्या बोटी आहेत. समुद्र किनार्यावर असलेल्या पोलीस ठाण्यांची संख्या ही देखील वाढलेली आहे. याशिवाय नौदलाकडे टेहाळणी करण्याकरिता असलेली विमाने आणि जहाजे यांची संख्याही वाढलेली आहे.

सगळ्या वेगवेगळ्या संस्थांना एका हेडकॉर्टरच्या खाली आणण्याकरिता जॉइन्ट ऑपरेशन सेंटर हे मुंबई, विशाखापट्टनम, कोची आणि पोर्ट ब्लेयरमध्ये तयार केलेले आहेत. यामध्ये समुद्र सुरक्षेकरिता असलेले सगळे घटक एका ठिकाणी येऊन काम केले जाते. तसेच वेगवेगळ्या गुप्तहेर संस्थांकडून त्यांना गुप्तहेर माहिती प्रत्येक आठवड्याला आणि महिन्याला गोळा करून ती सगळ्यांना संघटीतपणे दिली जाते. याशिवाय प्रत्येक वर्षी कमीत कमी दोन वेळा हे सगळे घटक एकत्र सराव करून, आपली क्षमता किती आहे हे तपासतात.

किनार पट्टीचे सिक्यूरिटी ऑडीट करण्याची गरज
सागरी सुरक्षेत पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत. पण आज सुद्धा जास्त बोटी,रडार व गुणात्मक सुधारणांची गरज आहे. अजूनसुद्धा छोटी बंदरे आणि अनेक किनार्यावर असलेली अणुशक्ती निर्माण करणारी केंद्रे किंवा रिफायनरीची बाह्य सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. कोस्टगार्ड, पोलीस आणि नौदल यांनी एकत्र मिळून अशा किनार्यावर असलेल्या संस्थांना अजून साधनाची गरज आहे.कोस्टगार्ड, पोलीस आणि नौदल,कस्ट्मंना या क्षेत्रामध्ये आपल्या स्वत:चे इंटिलिजंन्स तयार करण्याची खूप जास्त गरज आहे. आतापर्यंत गेल्या २० वर्षांमध्ये कोस्टगार्डने थोडेफार तस्करी थांबवण्यामध्ये यश मिळालेले आहे. त्यांनी दिलेल्या आकड्यांप्रमाणे गेल्या २० वर्षांत ९२० परकीय फिशिंग बोटस् आपल्या समुद्रामध्ये पकडल्या आहे.

आपल्या किनारपट्टीजवळ अनेक अशी छोटी बेटे आहेत, त्यावर आपले कोळी बांधव हे दिवसा राहतात आणि रात्रीच्या वेळी तिकडून परत येतात. अशा किनारपट्टीजवळ असलेल्या छोट्या बेटांवर कोणी जर तिथे तस्करीचे सामान उतरवले आणि नंतर घेऊन गेले तर ते थांबवण्याकरिता सध्या यंत्रणा नाही. थोडक्यात सुरक्षेमध्ये जिथे जिथे आपल्याला कमजोरी दिसत आहे त्याचा पुन्हा एकदा अभ्यास करण्याची गरज आहे. कोळी बांधव जर सुरक्षा कर्म्यांचे कान आणी डोळे बनले तर आपली सागरी सुरक्षा मजबुत होइल.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..