MENU
नवीन लेखन...

कॉश्च्युम डिझायनर भानु अथैया

कॉश्च्युम डिझायनर भानु अथैया यांचा जन्म २८ एप्रिल १९२९ रोजी कोल्हापुर येथे झाला.

मूळच्या महाराष्ट्रीय व मराठी असलेल्या भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये व भानू अथय्या या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध महिला वेशभूषाकार होत्या. कोल्हापूर येथे जन्मलेल्या लहानपणापासूनच रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्या मुळे त्यांनी मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला व गोल्ड मेडल घेऊन पदवी प्राप्त केली. हिन्दी चित्रपटाचे गीतकार व कवि सत्येन्द्र अथय्या यांच्या बरोबर लग्न झाले व त्या भानुमती राजोपाध्येच्या भानू अथय्या झाल्या.

त्यांना लहानपणापासूनच गांधीजींचे रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळेच त्यांना रिचर्ड ॲ‍टनबरो यांच्या ‘गांधी’ (१९८२) या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी कॉश्चूम डिझाईन करण्याची संधी मिळाली. देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या यांचा ऑस्कर प्रवास थक्क करणारा होता.

भानू अथय्या या १९५१ पासून भारतीय चित्रपटसृष्टीत सक्रिय होत्या. त्यांनी कामिनी कौशल या अभिनेत्रीसाठी पहिला कॉश्चूम डिझाइन केला होता. ‘श्री ४२०’ मधील अभिनेत्री नादिरा यांच्या साठी “मुड़-मुड़ के ना देख…” या गाण्यासाठी केलेला गाऊनने त्यांना नवीन ओळख दिली. अभिनेत्रा साधना यांच्या सलवार-कमीजचे डिजाईन हे भानु अथय्या यांचे असायचे. ज्याची जादू ७० च्या दशकात फॅशन म्हणून ओळखली गेली.

भानु अथय्या या अश्या ड्रेस डिजाइनर आहेत की, ज्याचे कपडे त्या पात्रात च्या भूमिकेत जात असत. भानु अथय्या यांनी १३० हून अधिक चित्रपटात गुरुदत्त, यश चोपड़ा, राज कपूर, आशुतोष गोवारिकर, कॉनरेड रूक्स और रिचर्ड एटेनबरो यांच्याबरोबर काम केले होते. ‘सी.आई.डी.’ , ‘प्यासा’ , ‘चौदहवी का चाँद’, और ‘साहब बीबी और ग़ुलाम’ ,’रेशमा और शेरा’ या चित्रपटानी भानु अथय्या यांना एक नवीन ओळख मिळाली.

भानु अथय्या यांनी ‘गाइड’ मध्ये वहीदा रहमान, ‘ब्रह्मचारी’ मध्ये मुमताज’, सत्यम् शिवम् सुंदरम्’ या चित्रपटातील झीनत अमान यांचाही कॉश्चूम भानू यांनीच डिझाइन केला होता. गुलजार यांच्या ‘लेकिन’ या चित्रपटासाठी भानू अथय्या यांना सर्वोच्च ड्रेस डिजाइनर अवार्ड मिळाले होते. भानु अथय्या यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटासाठी पण ड्रेस डिजाइन केले होते. भानु यांनी अनेक मालिका व नाटकासाठी पण ड्रेस डिजाइन केले होते. भानु अथय्या यांनी आपल्या जीवनावर ‘द आर्ट ऑफ़ कॉस्ट्यूम डिज़ाइन’ या नावाने एक पुस्तक पण लिहिले.

भानु अथैया यांचे १५ ऑक्टोबर २०२० रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..