‘CRICकथा‘ हा क्रिकेटला वाहिलेला मराठीतील एकमेव दिवाळी अंक मुद्रित तसेच डिजिटल स्वरूपात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रकाशित झाला आहे. मी लिहिलेला “तेथे कर माझे जुळती” हा लेख मुद्रित व डिजिटल अंकात, तर मी रचलेले “क्रिकेट शब्दकोडे”, मुद्रित अंकात समाविष्ट आहे.
ह्या अंकात विशेष काय वाचाल?
* द्वारकानाथ संझगिरी ह्यांच्या श्रीलंका क्रिकेटच्या आठवणी
* कॉमनवेल्थ रौप्य पदक विजेत्या भारतीय महिला संघाचा पदकाचा आढावा
* १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा कोच हृषीकेश कानिटकरशी खास गप्पा
* असा घडला शार्दूल – शार्दूल ठाकूरच्या वडिलांची मुलाखत
* जतीनच्या नजरेतून वासू परांजपे
* मी आणि क्रिकेट – विजय पटवर्धन, विजय केंकरे, आदिती सारंगधर
* काही वेगळे लेख – ऍड. असीम सरोदे, नम्रता वागळे
क्रिकेटमधील काही तांत्रिक माहिती, काही मनोरंजन आणि बरीच धमाल.
भारतासह ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा येथून मराठी माणसाने लिहिलेल्या क्रिकेटच्या आठवणी, किस्से आणि बरंच काही.
CRICकथा दिवाळी अंक आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध आहे.
तसेच हा अंक आपल्या जवळच्या वर्तमानपत्र विक्रेत्याकडे देखील मिळेल.
अमॅझॉन वर सुद्धा उपलब्ध –
धन्यवाद,
गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर,
माहिम, मुंबई.
Leave a Reply