नवीन लेखन...

सप्टेंबर १९ – ‘आर्थिक’ फ्लेमिंग आणि युवीचे छ्क्के

गोलंदाजाने एका डावात पाच बळी घेणे किंवा फलंदाजाने शतक करणे यापेक्षा फार जास्त दुर्मिळ आणि अतिशय कमी वारंवारता असलेली घटना म्हणजे एका क्षेत्ररक्षकाने एका डावात ५ गडी बाद करणे. यष्टीरक्षकांच्या बाबतीत हे तसे कमी वेळाच पण ‘बर्‍याचदा’ घडू शकते. निव्वळ क्षेत्ररक्षकाकडून हे घडणे म्हणूनच आश्चर्यजनक ठरते.

१९ सप्टेंबर १९९७ रोजी हरारेत सुरू असलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंगने एकाच डावात पाच झेल टिपले. सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाच्या व्हिक रिचर्डसनने १९३५-३६ च्या हंगामात असा विक्रम केला होता. दुसर्‍या डावात फ्लेमिंगने आणखी दोन झिम्मींना लपकून सामन्यातील झेलांची संख्या सातवर नेली. यासोबत त्याने पुन्हा एका विश्वविक्रमाची बरोबरी केली. एका कसोटीत सात झेल लपकण्याची कामगिरी सर्वप्रथम ग्रेग चॅपेलने केली होती १९७४-७५ च्या हंगामात इंग्लंडविरुद्ध पर्थमध्ये. स्टीफन फ्लेमिंगवर ‘फोकस’ एवढ्याचसाठी नाही – ग्रेग चॅपेल हा व्हिक रिचर्डसनचा नातू. आजोबा आणि नातवाचा विक्रम एकाच सामन्यात ‘बरोबरला’ गेल्याची ही कसोटी इतिहासातील बहुधा एकमेव घटना असेल. अर्थशास्त्रावरील एक पुस्तकही स्टीफन फ्लेमिंगने लिहिलेले आहे ही त्यामुळे नवलाची

गोष्ट ठरत नाही.

१९ सप्टेंबर २००७ ह्या दिवशी आंतरराष्ट्रीय विसविशीत सामन्यांमधील पहिले छ्क्केभरे षटक आले. गोलंदाज होता इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड. युवराज सिंगच्या या पराक्रमापूर्वी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केवळ दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्जनेच सहा चेंडूंच्या षटकात सहा षटकार लगावले होते. किंग्जमीडवरील विसविशीत विश्वचषकाचा हा सामना भारताने १८ धावांनी जिंकला. युवराज सिंगने या सामन्यात एकूण १६ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ७ षटकारांसह ५८ धावा चोपल्या. केवळ १२ चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक पुरे केले होते !! क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारातील आणि उपलब्ध इतिहासातील हे सर्वाधिक वेगवान अर्धशतक होते.

त्याच्या अर्धशतकाचा हा लेखाजोखा :सतरावे षटक गो. ट्रेम्लेट.५वा चेंडू – धाव नाही.६वा

चेंडू – चौकार.अठरावे षटक

गो. फ्लिन्टॉफद्सरा चेंडू – १ धाव.चौथा चेंडू – चौकार.५वा चेंडू – चौकार.६वा चेंडू – १ धाव.(आतापर्यंत ६ चेंडूंमध्ये १४ धावा)एकोणिसावे षटक गो. ब्रॉडसाही चेंडूंवर षटकार.षटकाअखेर अवघ्या १२ चेंडूंवर ५० धावा !!विसावे षटक गो. फ्लिन्टॉफदुसरा चेंडू – धाव नाही.तिसरा चेंडू – २ धावा.चौथा चेंडू – षटकार.५वा चेंडू – बाद. युवराज सिंग झे. कॉलिंगवूड गो. फ्लिन्टॉफ ५८ (१६ चेंडू, १४ मिनिटे, मारगती ३६२.५०)
— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..