अब्बास अली बेग यांचा जन्म १९ मार्च १९३९ रोजी हैद्राबाद येथे झाला. अब्बास अली बेग यांनी १९५४-५५ मध्ये रणजी द्वारा फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यास सुरवात केली ती आंध्र प्रदेशविरुद्ध. त्यांनतर त्यांनी म्हैसूर विरुद्ध खेळताना त्यांनी १०५ आणि नाबाद ४३ धावा केलेय. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटचा पहिला सामना १५ व्या वर्षी खेळला. त्या रणजी स्पर्धेच्या शेवटी यांनी ६२.३५ सरासरीने १८७ धावा केल्या. परंतु त्यापूर्वी १९५९ मध्ये ते लंडन येथील ऑक्सफोर्ड कॉलेजला शिकण्यास गेले. विद्यापीठाच्या संघाकडून ते १५ फर्स्ट क्लास सामने खेळले.तेथे त्यांनी फ्री फ्रॉस्टर्स विरुद्ध नाबाद २२१ आणि ८७ धावा केल्या. अब्बास अली बेग यांचा पहिला कसोटी सामना ते २३ जुलै १९५९ रोजी लंडन विरुद्ध खेळले.
त्यावेळी भारतीय संघ इंग्लंडला कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी गेलेला होता. त्या मालिकेच्या ४ थ्या सामन्याच्या वेळी त्यांना भारतीय संघातर्फे खेळण्याची विनंती केली. त्यांना विजय मांजरेकर यांच्या जागी खेळण्यास सांगितले कारण ते जखमी झालेले होते. त्यावेळी त्यांचे वय होते २० वर्षे १३१ दिवस. पहिल्या इनिंगमध्ये ते २६ धावांवर रे इलींगवर्थ यांच्याकडून बाद झाले. त्यावेळी सगळ्यात तरुण खेळाडू ते होते. त्यावेळी अब्बास अली बेग ८५ धावांवर असताना त्यांना ‘ डस्टी रोहड्स ‘ चा चेंडू लागल्यामुळे त्यांना रिटायर व्हावे लागले परंतु दुसऱ्या दिवशी ते पुढली विकेट पडल्यावर खेळायला आले ते ते ग्रेट नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्याबरोबर. ‘ डस्टी ‘ रोहडसने परत त्यांच्यावर द्रुतगतीने चेंडू टाकले परंतु यावेळी अब्बास अली बेग डगमगले नाहीत, त्यांनी त्यांनी वेगवेगळे फटके मारून त्यांचे शतक पुरे केले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पहिल्याच सामन्यामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये ११२ धावा केल्या. ते धावचीत झाले, त्यांना टेड डेक्स्टरने बाद केले. भारतीय खेळाडूने त्यांच्या पहिल्या सामन्यात परदेशामध्ये शतक झळकावणारे ते पहिले खेळाडू ठरले. अर्थात पॉली उम्रीगर यांनी देखील त्या सामन्यामध्ये शतक केले होते त्यांनी ११८ धावा केल्या परंतु तो भारतीय संघ पुढे ३७६ धावांवर ढेपाळला आणि भारतीय संघ तो सामना हरला.
मुंबईमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना ब्रेबॉर्न स्टेडियम मध्ये सुरु होता. ऑस्ट्रलियन संघामध्ये अॅलन डेव्हिड्सन, रे लिंडवॉल,रिची बेनॉ सारखे जबरदस्त खेळाडू होते. अब्बास अली बेग त्यांचा जुना साथीदार नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्याबरोबर खेळण्यास आले तेव्हा दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १३३ धावा केल्या त्यामध्येअब्बास अली बेग यांच्या ५० धावा होत्या. दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय सांग ४ बाद ११२ धावा असताना रामनाथ केणी यांच्याबरोबर खेळण्यास आले त्या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या तोफखान्याला व्यवस्थित उत्तर दिले अब्बास अली बेग ५८ आणि रामनाथ केणी हे ५५ धावांवर नाबाद होते, ते पॅव्हेलियनमध्ये परत येत होते. चहापानाच्या वेळी अब्बास अली बेग आणि रामनाथ केणी परत येत असताना नॉर्थ स्टँडच्या कुंपणावरून उडी मारून एक फ्रॉक घातलेली २० वर्षाची तरुणी अब्बास अली बेग यांच्या मागून आली आणि तिने पुढे येऊन त्यांचे चुंबन घेतले. त्यावेळी विजय मर्चंट समालोचन करत होते ते म्हणाले,“मला आश्चर्य वाटत की मी जेव्हा १००-२०० धावा केल्या तेव्हा या तरुणी कुठे होत्या.” अर्थात त्यांनी हे गमतीने म्हटले होते त्यावेळी दुसरे समालोचक बॉबी तल्यारखानही समालोचन करत होते तेपण विजय मर्चंट यांना गमतीने म्हणाले, “त्यावेळी त्या तरुणी स्टेडियममध्ये झोपल्या होत्या.” कारण एकच की तुम्ही फार स्लो खेळात होता आणि अब्बास अली जलद गतीने. कोणत्याही भारतीय मैदानावर कसोटी सामान्याच्या दरम्यान चुंबन घेण्याची ती पहिलीच घटना होती. ह्या भारतीय भूमीवरील चुंबनाचे पडसाद दूरवर उमटले हे अनेकांना माहीत नसेल परंतु सलमान रश्दी यांच्या कादंबरीमधील एक चित्र, ‘द किसिंग ऑफ अब्बास अली बेग.’ अशा शीर्षकाचे आहे.
त्यानंतरच्या हंगामात अब्बास अली बेग यांची पाकिस्तानविरुद्ध असफल कामगिरी झाली आणि त्यांनी चार डावात केवळ 34 धावा काढल्या होत्या. यामुळे त्यांना पुढील मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले. परंतु ते रणजी आणि दुलिप करंडक स्पर्धेत मोठ्या प्रमाणात उत्तम धावा करत होते. १९६६ मध्ये वेस्टइंडीजविरूद्ध घरच्या मैदानावर त्यांना संघात सामील करण्यात आले होते. बेगन यांनी या मालिकेत दोन कसोटीत 48 धावा काढल्या. त्याला पुन्हा वगळण्यात आले आणि पुन्हा क्रिकेट खेळले नाहीत. अब्बास अली बेग त्यांचा शेवटचा कसोटी सामना ३१ डिसेंबर १९६६ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळले.
१९७१ च्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी ते संघात दाखल झाले. १९७१ साली इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात त्यांना निवडण्यात आले होते. मात्र, त्यांना कोणत्याही कसोटीसाठी अकरा खेळाडूंमध्ये सहभागी केले गेले नाही. त्यांच्याऐवजी अशोक मंकड यांना प्राधान्य देण्यात आले होते.
अब्बास अली बेग भारतीय कसोटी समाने खेळले तसे ते अनेक सामने हैदराबाद, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सॉमरसेट कडूनही खेळले.
अब्बास अली बेग यांचे तीन लहान भाऊ-मुर्तझा बेग, मजहर बेग आणि मुजतबा बेग-सर्व व्यावसायिक क्रिकेट खेळले मुर्तझाने हैदराबादसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले परंतु अब्बासपेक्षा तो कमी यशस्वी ठरला.
अब्बास अली बेग यांनी १० कसोटी सामन्यामध्ये २३.७७ च्या सरासरीने ४२८ धावा केल्या. त्यामध्ये त्यांचे १ शतक आणि दोन अर्धशतके असून त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे ११२. तर त्यांनी २३५ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यांमधून त्यांनी ३४.१६ सरासरीने १२,३६७ धावा काढल्या असून त्यामध्ये त्यांची २१ शतके आणि ६४ अर्धशतके आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे नाबाद २२४ धावा.
अब्बास अली बेग यांचे तीन लहान भाऊ मुर्तझा बेग, मजहर बेग आणि मुजतबा बेग सर्वजण व्यावसायिक क्रिकेट खेळले असून मुर्तझाने हैदराबादसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले परंतु अब्बासपेक्षा तो कमी यशस्वी ठरला.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply