आल्फ्रेड पर्सी ” टिच ” फ्रीमॅन यांचा जन्म १७ मे १८८८ रोजी इंग्लंडमधील केंट येथे झाला. त्यांनी लेग स्पिन गोलंदाज म्हणून केंट आणि इंग्लंडकडून गोलंदाजी केली. टिच फ्रीमॅन यांच्याबद्दल सांगितले तर आताच्या पिढीला खरे वाटणार नाही त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १,५४,३१२ चेंडू टाकले आणि ३,७७८ विकेट्स घेतल्या तर एका इनिंगमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स ३८६ वेळा घेतल्या तर एका डावात १० किंवा १० पेक्षा जास्त विकेट्स १४० वेळा घेतल्या ह्या सर्व विकेट्स त्यांनी १८.४२ च्या सरासरीने घेतल्या. ही आकडेवारी थक्क करणारी आहेच पण अशक्य देखील वाटणारी आहे. त्यांनी फक्त १२ कसोटी सामन्यात ६६ विकेट्स घेतल्या. ह्या काही गोष्टी आधी सांगितल्या की क्रिकेटमध्ये अशीही गोलंदाजी करणारेही होते हे समजेल . त्यांना कसोटी क्रिकेट फक्त ४ वर्षे खेळण्यास मिळाले कारण त्यांनी पहिला कसोटी सामना खेळाला तो वयाच्या ३६ व्या वर्षी. खरे पाहिले तर त्यांची उंचीही इंग्लिश माणसाच्या मानाने कमीच होती ५ फूट २ इंच. त्यांची बोटे आणि मनगट अत्यंत बळकट होती आणि त्यांचा गोलंदाजीमधील स्टॅमिना खूप होता. त्यांच्या कमी उंचीमुळे फेकला गेलेला चेंडू गोलंदाजाला टोलवताना त्रास पडत असे कारण मुळातच तो चेंडू कमी उंचीवरून येत असे. त्यामुळे फलंदाजाला सरळ बॅटने खेळाताही धड येत नसे आणि जर फुटवर्क नीट नसेल तर त्याची विकेट हमखास ठरलेली असे. ते गुगुली पण अत्यंत प्रभावीपणे टाकत असत. त्यांची गोलंदाजीची ग्रीप तशी अनऑर्थडॉक्स लेग स्पिनर सारखी होती. त्यांचा पंजाही लहान होता त्यामुळे ते चेंडू कसा पकडतात ह्याचा नीट अंदाज फलंदाज येत नसे.
१९१० ते १९१४ पर्यंत ते केंटकडून खेळत होते परंतु पहिल्या महायुद्धामुळे ७ वर्षे फुकट गेली. टिच फ्रीमॅन यांनी १९१९ च्या लहान सीझनमध्ये ६० विकेट्स घेतल्या तर १९२० मध्ये १०२ विकेट्स घेतल्या तर १९२१ मध्ये १६६ विकेट्स घेतल्या आणि १९२२ मध्ये १९४ विकेट्स घेतल्या ही त्यांची जबरदस्त गोलंदाजी पाहून , परफॉर्मन्स पाहून विझडेनने १९२३ मध्ये त्यांना ‘ विझडेन क्रिकेटियर ऑफ द इअर ‘ म्हणून त्यांना सन्मानित केले.
टिच फ्रीमॅन यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना सिडने येथे खेळला तो १९ डिसेंबर १९२४ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध. पहिल्या दोन सामन्यात त्यांनी उत्तम गोलंदाजी केली पण ते विकेट्सच्या दृष्टीने महागच ठरले होते. पहिल्या सामन्यात त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये ४९ षटकांमध्ये १२४ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी ३७ षटकांमध्ये १३४ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यांनी फक्त १२ कसोटी सामने खेळले. त्यांनी शेवटचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ओव्हलवर १७ ऑगस्ट १९२९ रोजी खेळला खेळला . हा सामना अनिर्णित राहिला टिच फ्रीमॅन यांनी फक्त पहिल्याच इनिंगमध्ये गोलंदाजी केली कारण दुसरी इनिंग सामना अनिर्णित राहिल्यामुळे झालीच नाही. पहिल्या इनिंगमध्ये त्यांना एकही विकेट मिळाली नाही.
१९४९ मध्ये त्यांना एम.सी.सी.ची लाईफ मेंबरशिप मिळाली. त्यांच्या नावावर खूप रेकॉर्डस् आहेत . फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सहा लागोपाठ सीझनमध्ये त्यांनी १९२८ ते १३३ या कालखंडात १६७३ विकेट्स घेतल्या तर तसेच प्रत्येक सीझनमध्ये २५० विकेट्स पेक्षा जास्त विकेट्स त्यांनी घेतल्या. तर १९२९ , १९३० आणि १९३१ ह्या लागोपाठ तीन वर्षी त्यांनी एका इनिंगमध्ये १० विकेट्स घेतल्या. एका सामन्यात १७ विकेट्स अशा त्यांनी १९२२ आणि १९३२ मध्ये दोन वेळा घेतल्या. विल्फ्रेड रोड्स नंतर जास्त विकेट्स त्यांनी घेतल्या. विल्फ्रेड रोड्स यांनी ४२०४ विकेट्स घेतल्या तर टिच फ्रीमॅन यांनी ३७७६ विकेट्स घेतल्या. असे अनेक रेवर्ड्स यांच्या नावावर आहेत. एका इनिंगमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स त्यांनी ३८६ वेळा घेतल्या हाही त्यांचा रेकॉर्ड अजून अबाधित आहे.
अशा ग्रेट गोलंदाजांचे २८ जानेवारी १९६५ रोजी इंग्लंडमधील केंट येथे निधन झाले.
– सतीश चाफेकर.
Leave a Reply