आर्ची जॅक्सन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९०९ रोजी रुथेरग्लेन या लहानशा गावात झाला ते गाव स्कॉटलंड मधील ग्लासगो या शहरात आहे . येथे झाला. आर्ची जॅक्सन ह्यांचे नाव किती क्रिकेट रसिकांना माहीत आहे हे मला माहीत नाही कारण त्याची कारकीर्द अत्यंत लहान होती. तो जुनिअर टेक्निकल स्कूल मध्ये जात असतानाच ते क्रिकेट आणि फुटबॉल खेळात होते. त्यांचा चुलत भाऊ आणि काका हे दोघेही इंग्लंड आणि स्कॉटलंड मधील प्रोफेशनल फुटबॉलपटू होते. पुढे ते लिव्हरपूलसाठी कप्तानी करत होते.
जॅक्सन यांनी तिथल्या क्रिकेट क्लबमधून खेळण्यास सुरवात केली. थोडयाच कालावधीमध्ये कसोटी गोलंदाज आणि कप्तान आर्थर मैली यांचा नजरेस जॅक्सन आले . तेथील लेबर पॉलिटीशियन ‘ डॉक ‘ इव्हेट यांनी त्या तरुण खेळाडूकडे लक्ष दिले आणि त्याला योग्य असा क्रिकेटचा किट खरेदी करून दिला. १५ वे वर्ष आणि एक महिना झाला असताना आर्ची जॅक्सन फर्स्ट ग्रेड क्रिकेटमध्ये खेळले . क्रिकेटच्या इतिहासाचे जाणकार डेव्हिड फ्रिथ यांनी जॅक्सन वर विश्वास ठेवला.
आर्ची जॅक्सनने शाळा सुटल्यावर एका वेअरहाऊस मध्ये नोकरी सुरु केली . पुढे कसोटी फलंदाज अॅलन किपक्स याने जॅक्सनला त्याच्या स्पोर्ट्स शॉपमध्ये नोकरी दिले आणि पुढे तो त्याचा ‘ मेंटॉर ‘ झाला.१९२५-२६ मध्ये जॅक्सन ग्रेड क्रिकेटच्या स्पर्धेत भाग घेऊ लागला त्यामध्ये त्याची फलंदाजीची सरासरी उत्तम होती. त्यामुळे तो न्यू साऊथ वेल्स सेकंड ११ मधून व्हिक्टोरिया क्रिकेट संघासाठी साठी खेळले . १९२६-२७ च्या सीझनमध्ये त्याने सेट जॉर्ज विरुद्ध १११ धावा केल्या , वेस्टर्न सबर्बविरुद्ध १९८ केल्या तर मोर्सच्या विरुद्ध १०६ धावा केल्या .
आर्ची जॅक्सन यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यांमध्ये न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना ब्रिस्बेन इथे क्वीन्सलँड विरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये ८६ धावा केल्या. साऊथ ऑस्ट्रेलिया विरुद्ध नाबाद १०४ धावा केल्या. १९२७-२८ मध्ये कसोटी सामने झाले नाहीत परंतु इतर सामने चालू होते. त्याने १०४ धावा एका सामन्यांमध्ये केल्या आणि किपक्स बरोबर शतकी भागीदारी केली. पुढे काही सामन्यांमधून कमी धावा केल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध अँडलेट येथे होणाऱ्या सामन्यामध्ये त्याच्या ऐवजी सर डॉन ब्रॅडमन यांना घेण्यात आले . ब्रॅडमन यांचा त्यावेळी उदय होत होता. तो ब्रॅडमन यांचा पहिला फर्स्ट क्लास क्रिकेट सामना होता. पुढच्या सामन्यामध्ये जॅक्सन यांना सलामीला पाठवले आसनी तेव्हा त्यांनी दोन्ही इनिंगमध्ये शतके केली. त्यावेळी कसोटी सामने खेळणारे आणि नवीन खेळाडू हे एकत्र खेळत असत.
ऑस्ट्रेलिया ११ आणि न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या ४ सामन्यांमध्ये जॅक्सन यांनी ४९.५० च्या सरासरीने १९८ धावा केल्या. १९२८-२९ च्या सिरीजमध्ये इंग्लंडचा संघ पर्सी चॅपमन च्या नेतृत्वाखाली अँशेस साठी पाच कसोटी सामने खेळण्यासाठी आला असताना जॅक्सन दोनदा मेलबॉर्न येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये अनुत्तीर्ण झाले . न्यू साऊथ वेल्स आणि इंग्लंड यांच्यामधील सामन्यामध्ये आर्ची जॅक्सन ४ आणि ४० धावांवर बाद झाले . त्याचवेळी त्याच्याच संघामधील ब्रँडमन आणि किपक्स यांनी शतके केली होती. पुढे त्याने साऊथ ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना १६२ आणि ९० धावा केल्या आणि सिलेक्टर्सचे लक्ष वेधून घेतले . ऑस्ट्रेलियाने पहिले तीन कसोटी सामने आणि अँशेस हरल्यावर आर्ची जॅक्सनला संधी दिली ती ४ थ्या सामन्यात तो कसोटी सामना अँडलेट ओव्हल येथे होणार होता. त्या सामन्यामध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करून ३३४ धावा केल्या . सामन्याआधी ऑस्ट्रेलिया चा कप्तान जॅक रायडर यांनी किपक्स यांना सांगितले की हा तरुण खेळाडू सलामीच्या फलंदाजीची जबाबदारी समर्थपणे पेलेल का ? तेव्हा किपक्स म्हणाले मला त्याची खात्री आहे . तसेच झाले ऑस्ट्रेलियाने १९ धावांमध्ये ३ विकेट गमावल्या होत्या कारण समोर हेरॉल्ड लारवूड गोलंदाजी करत होता. १०५ मिनिटामध्ये जॅक्सन आणि रायडर यांनी १०५ मिनिटे खेळून १०० धावा केल्या . जॅक्सनच्या ५० धावा झाल्या होत्या, दिवसअखेर ऑस्ट्रलियाची धावसंख्या होती ३ बाद १३१ धावा . दुसऱ्या दिवशी रायडर बाद झाला आणि त्याच्या जागी ब्रॅडमन खेळायला आले. ह्या सामन्यामध्ये जॅक्सन यांनी तुफान फलंदाजी करून १६४ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिया मधील कसोटीमध्ये शतक करणारे सर्वात तरुण फलंदाज ठरले पुढे १९४८ साली नील हॉर्वे यांनी तो रेकॉर्ड मोडला.
आर्ची जॅक्सन यांनी फारच थोडे सामने खेळले त्यांनी ८ कसोटी सामन्यांमध्ये ४७४ धावा केल्या आणि त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती १६४ . आर्ची जॅक्सन याने शेवटचा कसोटी सामना १४ फेब्रुवारी १९३१ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला . तर त्यानिओ ७० फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये ४३८३ धावा केल्या त्या ४५.६५ या सरासरीने त्यामध्ये त्यांची ११ शतके आणि २३ अर्धशतके होती . त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावा होत्या १८२.
आर्ची जॅक्सन हे खरखर दुर्देवी म्हटले पाहिजेत कारण १९३१-३२ च्या सीझनमध्ये त्यांनी १८३ धावा केल्या ग्रेड क्रिकेट सामन्यांमध्ये गॉर्डन च्या विरुद्ध . त्यांचे न्यू साऊथ वेल्स च्या संघासाठी सिलेक्ट झाले होते परंतु त्याआधीच त्यांच्या तोंडामधून रक्त येऊन ते कोसळले . त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले त्यांना वाटले त्यांना एल्फ्युएन्झा झाला आहे . ते पाच दिवसात घरी आले आणि परत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले . तेथून ते बरे झाले , टी . बी . चे निदान केले गेले होते. परंतु फेब्रुवारी १९३३ क्रिकेट खेळताना ते पुन्हा खाली पडले आणि परत हॉस्पिटलमध्ये नेले परंतु या वेळी त्यांची तब्येत अत्यंत नाजूक होती .
आर्ची जॅक्सन.. सर डॉन ब्रॅडमन यांच्या आधीचा खेळाडू, पण दुर्दैवी… १६ फेब्रुवारी १९३३ रोजी वयाच्या २३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यावेळी इतक्या लहान वयात निधन होणारे आर्ची जॅक्सन हे पहिले कसोटी क्रिकेटपटू होते. त्यानंतर २००७ साली बांगलादेशचा कसोटीपटू मंजुराल इस्लाम राणा याचे वयाच्या २२ व्या वर्षी निधन झाले तो ६ कसोटी सामने खेळला होता.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply