रॉबर्ट ‘ बॉब ‘ विल्यम्स टेलर याचा जन्म १७ जुलै १९४१ रोजी इंग्लंडमध्ये झाला. बॉब टेलर हा डर्बीशायर टीमचा यष्टीरक्षक १९६१ ते १९८४ होता. तर इंग्लंडच्या संघाचा १९७१ ते १९८४ पर्यंत यष्टीरक्षक म्हणून होता. १ जून १९६० मध्ये तो दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध मायनर काउंटीज मधून पहिला फर्स्ट क्लास क्रिकेटचा सामना खेळला . बॉब टेलर त्याआधी तो एका क्लबकडून १९५९ मध्ये पहिला सामना खेळाला होता. डर्बीशायरचा जॉर्ज डॉकेस हा दुखापतीमुळे जखमी झाला तेव्हा पाहिले नाव यष्टीरक्षक म्हणून बॉब टेलर याचे आले.
त्यामध्ये त्याने ११ आणि ० धावा काढल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही म्हणजे त्याने स्टंपच्या मागे एकही झेल घेतला नाही. दुसर्यावेळी पण डर्बीशायर कडून ७ जून रोजी खेळताना त्याने ० आणि ८ धावा केल्या परंतु त्याला दोन झेल मात्र मिळाले. त्याने पहिली फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये विकेट घेतली ती ससेक्सच्या केन सुटल यांची केन पुढे ६१२ फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळला परंतु त्याच्या नशिबात एकही कसोटी सामना खेळणे नव्हते कारण त्याला १९५३-५४ मध्ये वेस्ट इंडिजच्या टूरवर नेले पण खेळवले गेले नाही. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ४९ शतके केली.
बॉब टेलरने १९६१ च्या सिझनमध्ये १७ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये ४७ झेल पकडले आणि ६ जणांना स्टंम्पिग करून बाद केले. बॉब टेलरला १९६४ च्या सीझनमध्ये त्याचा गुडघा जायबंदी झाल्यामुळे तर १९६७ मध्ये त्याला डोळ्याचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे त्याला ३ आठवडे विश्रांती घ्यावी लागली. यष्टीरक्षक म्हटले की गुडघ्याचे दुखणे येतेच त्याचेही तसेच झाले परंतु त्याच्या उत्तम क्षेत्ररक्षणामुळे त्याने त्याचे स्थान टिकवून ठेवले.
बॉब टेलर कसोटी सामने नसतील तर फर्स्ट क्लास सामने , काऊंटी सामने सतत खेळत असे. तो डर्बीशायरचा १९८५ मध्ये सेकंड ११ टीमचा आठ सामन्यासाठी कप्तान होता. त्याचे स्वतःच्या फिटनेस कडे सतत लक्ष असे. १९६४ ला झालेल्या दुखापतीमुळे त्याला त्या सीझनमधील ७ सामान्यापासून दूर रहावे लागले होते.
बॉब टेलरने पहिला कसोटी सामना २५ फेब्रुवारी १९७१ रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळला . त्यावेळी अॅलन नॉट इंग्लंडचा यष्टीरक्षक आणि फलंदाज सगळ्यांवर त्याच्या खेळाने प्रभाव पडत होता इंग्लंडचा यष्टीरक्षक अॅलन नॉट याने त्याचे ग्लोज आणि पॅड्स विशिष्ट पद्धतीने कापून तयार केले होते जेणेकरून त्याला यष्टिरक्षण करताना सोयीचे होईल . तो नेहमी ग्लोजमध्ये त्याच्या हाताला इजा होऊ नये म्हणून विशेष काळजी घेत असे,
अॅलन नॉटची जागा बॉब टेलरला घेण्यास निश्चित प्रयास पडले कारण अॅलन हा अत्यंत चपळ यष्टीरक्षक होता. तर बॉब टेलरने मात्र त्याच्या पंजात चेंडू येईल असे ग्लोज केले होते , ग्लोजला तो जास्त पॅडिंग करत नसे त्यामुळे जर वेगात घेणारा चेंडू बोट्टाला स्पर्श करून गेला तर ते मात्र खूप वेदनादायी होत असे. दुर्देवाने बॉब टेलरला त्याची जागा घेणे अवघड गेले परंतु अॅलन नॉट वर्ल्ड सिरीज क्रिकेट १९७७ मध्ये खेळावयास गेल्यामुळे बॉब टेलरला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी १९७७ मध्ये ‘विझडेन क्रिकेटियर ऑफ द इयर’ मिळाला.
बॉब टेलरने ५७ कसोटी सामन्यामध्ये १,१५६ धावा केल्या त्यामध्ये त्याची ३ अर्धशतके होती आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ९७. त्याने यष्टीरक्षक म्हणून त्याच्या काकीर्दीत १६७ झेल घेतले आणि ७ जणांना स्टंम्पिंग करून बाद केले. तो २७ एकदिवसीय सामने खेळला त्यामध्ये त्याने २६ झेल घेतले आणि ६ जणांना स्टंपिंग करून बाद केले. त्याची फर्स्ट क्लास क्रिकेटची कारकीर्दी फार मोठी आहे कारण जेव्हा जेव्हा तो कसोटी सामने खेळात नसे तेव्हा तो फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खेळात असे. त्याने ६३९ फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १२,०६५ धावा केल्या त्यामध्ये त्याचे १ शतक आणि २३ अर्धशतके होती. त्याची सर्वोच्च धावसंख्या होती १००. त्याने यष्टिरक्षण करताना १,४७३ झेल घेतले आणि १७६ जणांना स्टंम्पिग करून बाद केले. कदाचित कुणालाही माहीत नसेल परंतु रॉबर्ट ‘ बॉब ‘ विल्यम्स टेलर याचा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण करताना जास्तीत जास्त झेल घेण्याचा विक्रम केला आहे . त्याने १ ,४७३ झेल घेतले आणि १७६ जणांना स्टंपिंग करून बाद केले म्हणजे एकूण त्याने १,६४९ जणांना बाद केले . तर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडच्या जॉन मरे याचा क्रमांक आहे त्याने १२६८ झेल यष्टीरक्षण करताना घेतले आणि २५९ जणांना स्टंपिंग करून बाद केले म्हणजे एकूण १५२७ जणांना बाद केले.
बॉब टेलर हा सर्व प्रकारच्या क्रिकेट सामान्यांमधून १९८८ मध्ये निवृत्त झाला.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply