बॉब वूल्मर यांचा जन्म १४ मे १९४८ रोजी भारतामधील कानपुर येथे झाला. त्यांचे वडील क्रिकेटपटू होते ते रणजी ट्रॉफी साठी युनाइटेड प्रोव्हिन्सेस म्हणजे आत्ताच्या उत्तर प्रदेशासाठी खेळत होते. वयाच्या १० व्या हनीफ महंमद यांनी केलेल्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ४९९ धावा त्यांनी पाहिलेल्या होत्या . पुढे ३५ वर्षानंतर ते वॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबचे कोच असताना त्यांनी ब्रायन लाराला देखील ५०१ नाबाद धावा करताना पाहिले होते.
बॉब वूल्मर केंट येथील शाळेत शिकले ते १५ वर्षाचे असताना केंट चे कप्तान आणि कोच यांनी त्यांना ऑफ स्पिन गोलंदाजीकडून मिडीयम पेस गोलानंदजी कडे वळण्यास सांगितले.
शिक्षण पुरे झाल्यावर बॉब वूल्मर यांनी आय . सी. आय. कंपनीमध्ये सेल्स रिप्रेझेंनटेटिव्ह चे काम करू लागले. १९६८ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी केंट मधून एसेक्स विरुद्ध खेळले. त्यांनी १९६९ साली काऊंटी कॅप जिकली . १९७०-७१ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी ते दक्षिण आफ्रिकेचे कोच झाले ते १९७२ पर्यंत कोच होते . जेव्हा ते पहिला कसोटी सामना खेळले तेव्हा ते केंटमधील शाळेचे फिजिकल एज्यूकेशनचे शिक्षक होते. बॉब वूल्मर हे फर्स्ट क्लास क्रिकेट खूप खेळले होते.
बॉब वूल्मर पहिला कसोटी सामना ३१ जुलै १९७५ रोजी इंग्लंविरुद्ध खेळले तेव्हा ते २७ वर्षाचे होते. आपल्या मध्यम द्रुतगतीने त्यांनी एम.सी.सी कडून खेळताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध हॅट-ट्रिक केली होती . परंतु पहिल्या कसोटी सामन्यानंतर त्य्यांना ड्रॉप करण्यात आले आणि त्यांना त्या सीरिजच्या शेवटच्या सामन्यात खेळवण्यात आले तो सामना ओव्हलवर होता . या सामन्यामध्ये ५ व्या क्रमांकावर खेळताना १४९ धावा काढल्या. १९७७ मध्ये आणखी दोन शतके ऑस्ट्रेलिया विरुद्ध काढली .
बॉम्ब वूल्मर त्याआधीपासून इंग्लंडची एकदिवसीय सामने खेळत होते. त्यांनी त्यांचा पहिला एकदिवसीय सामना २४ ऑगस्ट १९७२ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला . ते १९७६ पर्यंत एकदिवसीय सामने खेळत होते.
इतर क्रिकेटपटूंपेक्षा त्यांची क्रिकेट करियर फार वेगळी होती कारण ते १९६८ पासून क्रिकेट कोच म्हणून करिअर करत होते आणि त्यानंतर ते ७ वर्षाने पहिला कसोटी क्रिकेट सामना खेळले. परंतु ते फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्त झाले ते १९८४ मध्ये त्यांनी क्रिकेटमध्ये कोचिंग केले त्याचप्रमाणे त्यांनी शाळेमधील मुलांसाठी हॉकी साठी देखील कोचिंग केले. अनेक क्लबना त्यांनी प्रोत्साहन दिले , मदत केली . १९८७ साली ते इंग्लंडला परत आले आणि केंट मध्ये कोचिंग करू लागले. ते वॉर्कशायर काऊंटी क्रिकेट क्लब मध्ये १९९१ मध्ये कोचिंग करू लागले. त्यांच्यामुळे १९९३ मध्ये नेटवेस्ट ट्रॉफी जिकता अली आणि त्यानंतर दुसऱ्याच वर्षी तीन ते चार ट्रॉफीज जिकल्या.
१९९० मध्ये क्रिकेटमधील ‘ रिवर्स स्वीप ‘ फटका सर्व फलंदाजांमध्ये पॉप्युलर केला . त्याचप्रमाणे त्यांनी पहिल्यांदा कॉम्पुटर ऍनालिसीस वापरले ते गोलकीपर आणि विकेटकीपर यांच्यासाठी. १९९९ च्या वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिले असेल तर हॅन्सी क्रोनिएने कानाला एक इयर पीस कम्युनिकेशन लावला गेला होता आणि नंतर त्यावर बंदी आली होती त्याप्रसंगांशी ते निगडीत होते.
२००४ मध्ये बॉब वूल्मर पाकिस्तान संघाचे कोच म्ह्णून काम करू लागले. त्यामुळे पाकिस्तानी संघाला फायदा होऊ लागला . २००५ साली भारतमध्ये ते टेस्ट सिरीज १-१ ने बरोबरीत केली कारण पूर्वी ते सिरीज हरले होते . त्याचप्रमाणे त्यांनी २००५ मध्ये इंगलंड विरुद्ध एकदिवसीय सिरीज ४-२ ने जिंकली होती. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या संघाने श्रीलनाकेविरुद्धचे समाने देखील जिकंले
२००६ मध्ये ‘ बॉल टॅम्परिंग ‘ चा आरोप बॉब वूल्मर यांच्या पाकिस्तानच्या संघावर केला गेला त्यावेळी इंग्लंडविरुद्व ब्रिस्टॉल येथे २०-२० सामना चालला होता. २००६ मध्ये ‘ बॉल टॅम्परिंग ‘ क्रिकेट मध्ये केले तरी चालेल अशा आशयाच्या कायदा दुरुस्त करावा अशी त्यांनी भूमिका मांडली होती परंतु ती अर्थात नाकारली गेली.
बॉब वूल्मर बद्दल खूप लिहिता येईल एक व्यक्ती म्हणून . इंझममच्या त्याच्या एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता , ‘ बॉब वूल्मर क्रिकेटच्या बाबतीत पूर्ण डेडिकेटेड होता.’ बॉब वूल्मरने १९ कसोटी सामन्यांमध्ये १०५९ धावा केल्या त्यामध्ये त्यांची ३ शतके आणि २ अर्धशतके होती . त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती १४९. तर त्यांनी ६ एकदिवसीय समाने खेळले होते. बॉब वूल्मरने ३५० फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये १५,७७२ धावा केल्या त्यामध्ये ३४ शतके आणि ७१ अर्धशतके होती . त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २०३ तर त्यांनी ४२० विकेट्सही घेतल्या होत्या. एका इनिंगमध्ये ४७ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या.
ते पाकिस्तानचे कोच असताना २००७ च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आयर्लंड कडून हरला . त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ मार्च २००७ रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्या खोलीमध्ये आढळला . जमेका पोलीस आणि स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी सर्व गोष्टी तपासून बघितल्यानंतर त्यांच्या मृत्यू नैसर्गिक होता असे सिद्ध झाले. मला आठवतंय एक मोठ्या चॅनल वर मी त्यावेळी लाइव्ह क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्यांचे विश्लेषण ग्राफालॉजीच्या माध्यमातून करत असताना त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता हे सांगितले त्यावेळी माझ्यावरही टीका झाली होती परंतु त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता , प्रचंड दडपणामुळे आणि नैराश्याने आला होता . कारण आदल्याच रात्री त्यांच्या पत्नीला त्यांनी मॅसेज पाठवला होता मी लवकर येत आहे , अर्थात हे मला मागाहून काही दिवसांनी कळले.
– सतीश चाफेकर.
Leave a Reply