चेतन प्रताप सिंग चौहान यांचा जन्म 21 जुलै 1947 रोजी उत्तर प्रदेशमधील बरेली येथे झाला. परंतु ते 1960 रोजी पुण्यास रहाण्यास आले. कारण त्याचे वडील आर्मी ऑफिसमध्ये काम करत असत. तेथे त्यांची बदली झाली होती. चेतन चौहान यांनी त्यांची कॉलेजमधील डिग्री पुण्यामधील वाडिया कॉलजमधून घेतली. पुण्यात त्यांना क्रिकेटचे कोचिंग दिले ते महाराष्ट्राचे क्रिकेटपटू कमल भांडारकर यांनी. 1966-67 मध्ये चेतन चौहान यांनी पुणे विद्यापीठासाठी रोहिंग्टन बात्रा ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळले , आणि त्याच सीझनमध्ये त्यांची निवड वेस्ट झोनसाठी झाली ती विझी ट्रॉफीसाठी. तेथे त्यांनी नॉर्थ झोन विरुद्ध खेळताना त्यानी 103 धावा केल्या आणि साऊथ झोन विरुद्ध खेळताना त्यांनी 88 आणि 63 धावा केल्या. त्या सामन्यात त्याच्याबरोबर सलामीला खेळात होते सुनील गावस्कर.
चेतन चौहान यांना 1967 मध्ये विझी ट्रॉफीसाठी महाराष्ट्राच्या रणजी टीममध्ये त्यांची निवड झाली. त्यानंतर पुढील मोसममध्ये त्यांनी शतक केले ते मुंबईविरुद्ध परंतु तो सामना पावसाने धुवून टाकला. त्यावेळी पहिल्या सहा विकेट्स फक्त 52 धावांवर गेल्या होत्या. तर दुलीप ट्रॉफी साठी खेळताना साऊथ झोन विरुद्ध त्यांनी 103 धावा केल्या. त्यानंतर त्यांची कसोटी सामन्यासाठी निवड झाली. चेतन चौहान यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना 25 सप्टेंबर 1969 रोजी न्यूझीलंड विरुद्ध मुंबईमधील ब्रेबॉर्न स्टेडियम येथे झाला. पहिल्या इनिंगमध्ये ते सलामीला अबिद अली बरोबर खेळण्यास आले तेव्हा ते 18 धावांवर बाद झाले. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 34 धावा काढल्या.
चेतन चौहान यांनी 1979 मध्ये ओव्हल मैदानावर सुनील गावस्कर यांच्याबरोबर 213 धावांची विक्रमी भागीदारी केली, कारण त्यांनी विजय मर्चन्ट आणि मुश्ताक अली यांचा जुना 203 धावांचा 1936 साली ओल्ड ट्रॅफर्डवर केलेला विक्रम मोडला. तेव्हा चेतन चौहान यांनी 80 धावा केल्या होत्या. दुर्देवाने त्याच्या कारकीर्दीत त्यांना कसोटी शतक करता आले नाही तरीसुद्धा त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 2084 धावा केल्या. त्यांची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती 97 धावा. परंतु त्यांनी डोम्सस्टिक क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या.
चेतन चौहान यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना 13 मार्च 1981 रोजी न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे खेळला त्या सामन्यात त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 36 धावा तर दुसऱ्या इनिंगमध्ये 7 धावा केल्या, हा सामना अनिर्णित राहिला.
चेतन चौहान यांनी 40 कसोटी सामन्यात 2084 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी 16 अर्धशतके केली. त्याप्रमाणे त्यांनी 2 विकेट्सही घेतल्या तसेच 38 झेलही पकडले. त्यांनी ऐकून 7 एकदिवसीय सामने खेळले त्यामध्ये त्यांनी 153 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यात त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती 46 धावा . त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटची कारकिर्द खरोखरच मोठी आहे त्यांनी 179 सामन्यात 11,143 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी 21 शतके आणि 59 अर्धशतके केली. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती 207 धावा तसेच त्यांनी 51 विकेट्सही घेतल्या होत्या. त्यांनी एका इनिंगमध्ये 26 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या आणि एकूण 189 झेलही पकडले होते.
चेतन चौहान कारकिर्द खूप चढ उताराची आहे तरीपण त्यांना जेव्हा जेव्हा खेळण्यास मिळाले ते त्यांच्या जबरदस्त क्षमतेमुळे हे अनेक गोष्टीवरून दिसून येते कारण सुनील गावस्कर यांच्याबरोबर ते 59 वेळा सलामीला आले आणि त्यांनी 3022 धावा केल्या यावरून दिसून येते. निवृत्तीनंतर ते दोनदा लोकसभेवर उत्तरप्रदेशकडून निवडून गेले .२०१८ मध्ये ते ‘ युथ आणि स्पोर्ट्स ‘ चे उत्तरप्रदेशचे मंत्री झाले.
चेतन चौहान यांचे 16 ऑगस्ट 2020 या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply