नवीन लेखन...

क्रिकेटपटू इ. ए .एस . प्रसन्ना

इरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म २२ मे १९४० रोजी बेंगलोर येथे झाला. त्यांनी पहिला कसोटी सामना १० जानेवारी १९६२ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला . ते ऑफ स्पिन गोलंदाजी करत असत आणि त्यात ते अत्यंत निष्णात होते. त्यावेळी बिशनसिग बेदी , चंद्रशेखर आणि प्रसन्ना हे त्रिकुट क्रिकेटमध्ये अक्षरशः विरुद्ध संघाला हैराण करत होते.

प्रसन्ना यांनी कसोटी क्रिकेटची सुरवात १९६२ मध्ये केली खरी परंतु ते आधी फक्त दोन सामने खेळले एक इंग्लंडविरुद्ध आणि दुसरा ऑस्ट्रेलियाविरुद्ध परंतु त्यांनी कसोटी क्रिकेट खेळणे थांबवले कारण त्यांचे शिक्षण चालू असल्यामुळे त्यांनी कसोटी क्रिकेट काही काळ बंद केले.

त्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये ३३ धावा केल्या आणि ४ विकेट्स घेतल्या . ते इंजिनीअर झाल्यानंतर परत क्रिकेटकडे वळले . खरे तर मध्ये ब्रेक घेतल्यावर सहसा परत संघात येणे कठीण असते परंतु प्रसन्ना खऱ्या अर्थाने स्पेशल गोलंदाज होते.

त्यानंतर ते १९६७ मध्ये त्यांनी परत भारतीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि १३ जानेवारी १९६७ रोजी ते त्यांचा तिसरा कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नई येथे खेळले. त्या सामन्यांमध्ये त्यांनी ५ विकेट्स घेतल्या आणि २५ धावा केल्या. त्यावेळचे कप्तान मन्सूर अली खान पतौडी यांना त्यांच्या कामगिरीवर विश्वास होता म्हणून त्यांना त्यांनी पूढे संधी दिली. अर्थात त्यांना अनेक वेळा आकसाने ड्रॉप केले गेले त्याचा फायदा वेंकटराघवन यांना मिळत गेला. कारण तेदेखील स्पिन गोलंदाज होते.

प्रसन्ना यांच्या गोलंदाजीचे विशेष असे होते की ते चेंडू ‘ लूपिंग ‘ पद्धतीने स्पिन करायचे . असेही म्हटले जाते त्यांचा चेंडू इतका फिरत येई की जर तो कानाजवळून गेला तर वेगळा विशीष्ट ‘ चेंडू फिरण्याचा ‘ आवाज येत असे . तर कशी ते चेंडू बाउन्स करताना चेंडूला उंची देत असत त्यामुळे समोरील फलंदाज चूक करण्यास प्रवृत्त होत असे.

प्रसन्ना हे फक्त भारतीय खेळपट्टीवर प्रभावी ठरले नाहीत तर परदेशी खेळपट्टीवर देखील प्रभावी ठरले. चेंडू टाकताना त्यांचा चेंडूवर अत्यंत कंट्रोल असल्यामुळे त्यांचे चेंडू सरळ विकेटकडे येत असत इतरत्र जात नसत हे महत्वाचे. ते चेंडूला उत्तमपणे फ्लाइट द्यायचे . सतत अनेक षटके ते अत्यंत काटेकोरपणे चेंडू टाकत असत त्यामुळे धावासाठी उतावीळ असलेल्या फलंदाजांचा संयम संपत असे आणि तो फटका मारण्याच्या नादात बाद होत असे. त्यांच्या दृष्टीने नंबर महत्वाचे नसून ‘ कॉलिटी ‘ महत्वाची असते.

१९६७-६८ मध्ये प्रसन्ना यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध लागोपाठ झालेल्या ९ कसोटी सामन्यामध्ये ४८ विकेट्स काढल्या.

१९७८ मध्ये पाकिस्तनाच्या टूरनंतर बिशनसिग बेदी आणि भागवत चंद्रशेखर यांनी टीम सोडल्यानंतर प्रसन्ना यांनीदेखील त्यांची निवृत्ती जाहीर केली . शेवटच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये ९४ धावा देऊन त्यांना एकही विकेट मिळालेली नव्हती.

प्रसन्ना यांनी शेवटचा कसोटी सामना २७ ऑक्टोबर १९७८ रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला . त्यांनी ४९ कसोटी सामन्यामध्ये ७३५ धावा केल्या आणि १८९ विकेट्स घेतल्या . त्यांनी एका इनिंगमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स १० वेळा घेतल्या होत्या तर २ वेळा एक सामन्यामध्ये १० किंवा १० पेक्षा कास्ट विकेट्स घेतल्या होत्या. त्यांनी एका इनिंगमध्ये ७६ धावा देऊन आठ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी २३५ फर्स्ट क्लास सामान्यामधून २४७६ धावा केल्या आणि २३.४५ च्या सरासरीने ९५७ विकेट्स घेतल्या. एका इनिंगमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त खेळाडू ५६ वेळा बाद केले तर एक सामन्यामध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त खेळाडू ९ वेळा बाद केले. त्यांनी एका इनिंगमध्ये ५० धावा देऊन ८ खेळाडू बाद केले.
१९७० साली इ . ए . एस. प्रसन्ना यांना भारत सरकारने पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला. तर २०१२ रोजी बी. सी. सी. आय. ने देखील त्यांचा सन्मान केला .

इ . ए . एस. प्रसन्ना यांनी त्यांचे ‘ वन मोअर ओवर ‘ हे आत्मचरित्र लिहिले आहे. आजही प्रसन्ना यांच्याबद्दल जनमानसामध्ये आदर असून अनेक तरुण वर्ग त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे..

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..