गुलाबराय रामचंद यांचा जन्म २६ जुलै १९२७ रोजी कराची येथे एक सिंधी कुटूंबामध्ये झाला. विझडेन एशियाच्या माहितीप्रमाणे ते पहिले ‘कमर्शियल ब्रॅण्ड्स’ असणारे खेळाडू होते. तेथे त्यांनी सिंधसाठी क्रिकेट खेळण्यास सुरवात केली . भारताच्या फाळणीनंतर ते मुंबईमध्ये आले.
गुलाबराय रामचंद यांनी पहिला कसोटी सामना ५ जून १९५२ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळाला होता. त्यांची कसोटी समान्यांमधील निवड ही ‘ सरप्राईझ ‘ होती. कारण हेडिंग्ले येथील सामन्यांमध्ये दोन्ही क्रिकेट सामन्यांमध्ये ते शून्य धाव असतानाच बाद झाले होते. त्या टूरमधील चारही सामन्यांमध्ये ते खेळले. त्यामध्ये त्यांनी फक्त ६८ धावा केल्या होत्या आणि चार खेळाडू बाद केले होते. परंतु त्यांचा परफॉर्मन्स १९५२-५३ च्या वेस्ट इंडिज टूर मध्ये खूप सुधारला त्यावेळी ते वरच्या क्रमांकावर खेळायला आले तर त्यांना नवीन चेंडूने गोलंदाजीची करण्यास दिली गेली . तेव्हा त्यांनी २४९ धावा २४.९० च्या सरासरीने केल्या. आणि त्या पाच सामन्याच्या सिरीजमध्ये आठ विकेट्सही घेतल्या.
जेव्हा भारतीय संघ १९५५ मध्ये पाकिस्तानच्या टूरवर गेला असताना २४.१० च्या सरासरीने त्यांनी धावा काढल्या आणि १० विकेट्सही घेतल्या. त्यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये ५३ महत्वाच्या धावाही केल्या कारण ते खेळण्यास येण्याच्या आधी भारतीय संघाची धावसंख्या होती ७ बाद १०३ धावा. तर त्यांनी पाचव्या कसोटी सामन्यांमध्ये कराची येथे ४९ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या होत्या.
१९५५ मध्ये रामचंद ह्यांनी कोलकता येथे नाबाद १०६ धावा न्यूझीलंडविरुद्ध केल्या तर ऑक्टोबर १९५६ मध्ये त्यांनी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियम इथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध १०९ धावा केल्या त्यावेळी रे लिंडवॉल , पॅट क्रोफर्ड , अॅलन डेव्हिडसन आणि रिची बेनॉ सारखे नावाजलेले गोलंदाज होते. त्यावेळी त्यांनी १९ चौकार मारले .
त्यानंतर दोन वर्षांनी पुढल्या सिरीजमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्याची कसोटी मालिका त्यांच्या दृष्टीने फारशी यशस्वी झाली नाही त्यात त्यांनी पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये नाबाद ६७ धावा केल्या आणि तो सामना अनिर्णित राहिला.
१९६९ च्या डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पाच सामन्यांमध्ये जी . एस. रामचंद्र कप्तान म्हणून होते परंतु त्या सामन्यांमध्ये त्यांचा परफॉर्मन्स फारसा चांगला झाला नाही परंतु त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना जिकला. त्यांच्या कप्तान पदाविषयी माध्यमांनी त्यांची स्तुतीही केली होती परंतु भारतीय संघ ती सिरीज २-१ ने हरला होता. चंदू बोर्डे यांनी देखील त्यांच्याबद्दल स्तुति केली होती अर्थात ही रामचंद यांची शेवटची सिरीज होती. त्यांनी शेवटचा कसोटी सामना २३ जानेवारी ११९६० रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला .
जी. एस. रामचंद हे दुसऱ्या फळीमध्ये खेळण्यास येत असत तर कधी नवीन चेंडू घेऊन गोन्दाजीही करत असत. ते मिडियम पेस – सीडींग गोलंदाजी करत असत. त्यांचे चेंडू इनस्विंग होत असत.
रामचंद यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सुरवात १९४५-४६ मध्ये रणजी सामन्यांमधून सिंध विरुद्ध महाराष्ट्र या सामन्यामधून केली . रामचंद हे मुंबई संघाचे खेळाडू होते जो संघ पाच वेळा रणजी समाने जिंकला आणि त्या पाचही सामन्यांमध्ये त्यांनी शतक केले होते. रणजी सामान्यांच्या शेवटच्या सेशनमध्ये त्यांनी दोन्ही इनिंगमध्ये नाबाद ५० आणि नाबाद ८० धावा केल्या होत्या त्यावेळी ते १० व्या क्रमांकावर खेळण्यास येत असत. त्यांनी १९५१-५२ मध्ये होळकर संघाविरुद्ध खेळताना १४९ धावा केल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी १९५९-६० मध्ये म्हैसूरच्या विरुद्ध १०६ धावा केल्या होत्या. तर राजस्थानविरुद्ध त्यांनी १९६०-६१ मध्ये ११८ धावा केल्या होत्या.
रामचंद यांचे खेळामधली सातत्य यात दिसून येते. त्याचप्रमाणे १९६२-६३ मध्ये राजस्थानविरुद्ध नाबाद १०२ धावा केल्या होत्या.
जी . एस. रामचंद ह्याचा स्वतःवर विश्वास तर होताच परंतु खेळाडूंना ते खूप प्रोत्साहन देत असत.
जी. एस. रामचंद यांनी ३३ कसोटी सामन्यामध्ये १,१८० धावा केल्या त्यामध्ये त्यांची २ शतके आणि ५ अर्धशतके होती. त्यांची कसोटी समान्यामधील सर्वोच्च धावसंख्या होती १०९ तर त्यांनी ४१ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांची सर्वोत्कृष्ट एका इनिंगमधील गोलंदाजी होती ६ बाद ४९ धावा. त्यांनी १४५ फर्स्ट क्लास सामने खेळले असून त्यामध्ये त्यांनी ६,०२६ धावा काढल्या त्यामध्ये त्यांनी १६ शतके आणि २८ अर्धशतके काढली. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद २३० . त्यांनी २५५ विकेट्सही घेतल्या. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी एका इनिंगमध्ये १२ धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या आहेत.
जी. एस. रामचंद यांनी १९७५ च्या वर्ल्ड कप मध्ये टीम मॅनेजर म्हणून काम बघीतले होते. ते एअर इंडिया मध्ये काम करत होते. १९९५ मध्ये त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला होता त्यातून ते बरेही झाले होते . परंतु पुढे त्यांना दोन महिन्यातच तीन हृदयविकाराचे झटके आले त्यातच त्यांचे ८ सप्टेंबर २००३ रोजी मुंबईमध्ये निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply