“ग्रेग स्टीफन चॅपल याचा जन्म ७ ऑगस्ट १९४८ रोजी दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये झाला. ग्रेग चॅपल यांनी लहानपणापासून त्यांच्या वडिलांकडून घेतले ते अँडलेट मधून ग्रेड क्रिकेट खेळलेले होते त्याचप्रमाणे त्यांचे आजोबा विक रिचर्डसन हे देखील उत्तम खेळाडू होते. ते ऑस्ट्रेलियान क्रिकेट संघाचे कप्तान होते.
ग्रेग चॅपल यांचे भाऊ इयान आणि ट्रॅव्हर हे देखील कसोटी क्रिकेट खेळलेले आहेत. ग्रेग चॅपल इयान चॅपेलच्या पायवाटेने गेले आणि खूप यशस्वी झाले. ते बास्केटबॉलपण खूप खेळले. ग्रेग चॅपल वयाच्या आठव्या वर्षी पहिला सामना खेळले. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी पहिले शतक केले आणि दक्षिण ऑस्ट्रलियामधील शाळेमधून त्यांची खेळण्यासाठी निवड झाली. अभ्यास करता करता त्यांचे सगळे लक्ष क्रिकेटकडे होते.
अचानक १९६४-६५ मध्ये ग्रेग चॅपल यांनी सात आठवड्यामध्ये १० शतके केली. शाळेच्या एका सामन्यामध्ये त्यांनी व्दिशतक केले आणि अँशले वूडकॉक यांच्याबरोबर पहिल्या विकेटसाठी स्कॉट कॉलेज विरुद्ध ३०० धावांची भागीदारी केली. पूढे अँशले वूडकॉक यांनी ऑस्ट्रेलिया कडून कसोटी क्रिकेट खेळले . ग्रेग चॅपल यांचे कोच फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणारे गेस्टर बेनेट म्हणाले ‘ ग्रेग चॅपेल हे शालेय जीवनात सर्वोत्तम शाळेतील क्रिकेटपटू होते .’ चॅपल बंधू १९६६ मध्ये पोर्ट अँडलेटच्या विरुद्ध शेवटच्या सामन्यामध्ये पहिल्यांदा एकत्र खेळले . त्यानंतर ग्रेग चॅपल दक्षिण आफ्रिकेच्या टूरवर गेले असताना त्यांनी नाबाद १०१ , नाबाद १०२ आणि ८८ धावा क्लबसाठी केल्या.
ग्रेग चॅपल हे वयाच्या १८ व्या वर्षी पहिल्या फर्स्ट क्लास क्रिकेट सामना व्हिक्टोरिया विरुद्ध अँडलेट ओव्हल वर खेळले . पुढे क्वीन्सलँड विरुद्ध खेळताना १४ इनिंगमध्ये ३८६ धावा केल्या. त्यानंतर त्यांना ४ चौथ्या स्थानावर खेळण्यासाठी त्यांचे प्रमोशन झाले आणि त्यावेळी तिसऱ्या स्थानावर इयान चॅपल खेळत होते . त्या हंगामात ग्रेग चॅपेलने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना १५४ धावा केल्या परंतु ते सर्व फटके लेग साइडला मारत असत त्यामुळे कसोटी क्रिकेटसाठी निवड होण्यास अडचण येत असे. १९६९-७० चा सीझनमध्ये ग्रेग चॅपल यांनी ४ शतके केली त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या ‘ अ ‘ टीमबरोबर न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली . त्या टूरमध्ये ग्रेग चॅपल यांनी ५७.७० च्या सरासरीने ५१९ धावा केल्या , समोरच्या टीमला अक्षरशः डॉमिनेट केले.
ग्रेग चॅपल यांनी पहिला कसोटी सामना ११ डिसेंबर १०७० रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला . १९७०-७१ मध्ये अँशेस सिरीजमध्ये ग्रेग चॅपल पहिला कसोटी सामना खेळले तो १२ वा खेळाडू म्ह्णून आणि त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये ते ७ व्या क्रमांकावर खेळण्यास आले आणि त्यांच्या पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये त्यांनी शतक केले. तर शेवटच्या कसोटीमध्ये त्यांनी ६५ धावा केल्या. तर पाकिस्तानविरुद्ध मेलबोर्नला त्यांनी नाबाद ११६ आणि ६५ धावा केल्या तर ६१ धावा देऊन ५ विकेट्स सिडनेला घेतल्या. १९९० मध्ये ग्रेग चॅपल यांनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यामध्ये ३८० धावा एका सामन्यात केल्या , पहिल्या इनिंगमध्ये नाबाद २४७ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १३३. ग्रेग चॅपल यांनी शेवटचा कसोटी सामना ६ जानेवारी १९८४ रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला .
ग्रेग चॅपल यांनी ८७ कसोटी सामन्यांमध्ये ७११० धावा केल्या त्या ५३.८६ च्या सरासरीने . त्यांची कसोटी समान्यांमधील सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद २४७ धावा . कसोटी सामन्यांमध्ये त्यांची २४ शतके आणि ३१ अर्धशतके होती. त्याचप्रमाणे त्यांनी ४७ विकेट्स घेतल्या आणि १२२ झेलही पकडले. त्यांनी ७४ एकदिवसीय सामन्यामध्ये २३३१ धावा केल्या त्यामध्ये त्यांची ३ शतके आणि १४ अर्धशतके होती त्यांची एकदिवसीय समान्यांमधील सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद १३८ धावा. त्याचप्रमाणे त्यांनी ७२ विकेट्सही घेतल्या. त्यांनी ३२१ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये २४ ,५३५ धावा केल्या त्यामध्ये ७४ शतके आणि १११ अर्धशतके होती आणि त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद २४७ धावा. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २९१ विकेट्स घेतल्या तर एका इनिंगमध्ये ४० धावा देऊन ७ खेळाडू बाद केले आणि ३७६ झेलही पकडले.
ग्रेग चॅपल आणि विवाद यांचे नाते अतूट आहे ह्याचा अनुभव आजपर्यंत सर्वाना आला आहे. त्यावर लिहावयाचे म्हटले तर वेगळा चॅप्टरच लिहावा लागेल. भारतीयांना गांगुली आणि ग्रेग चॅपल हा वाद चांगलाच माहित आहे. तसेच त्यांनी रेडिओ आणि चॅनेलकरून समालोचनही केले आणि आजही करत आहेत.
ग्रेग चॅपल ऑस्ट्रलियाचे कप्तान असताना ४८ सामन्यांपैकी २१ सामने जिकंले तर १३ सामने हरले आणि १४ सामने अनिर्णित राहिले. ग्रेग चॅपल यांना ९ वेळा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाले . त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया चे १९८६ साली ‘ स्पोर्स्ट ऑस्ट्रेलिया हॉल ऑफ फेम ‘ त्यांना मिळाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply