डग्लस जॉन ” डग ” इन्सोल यांचा जन्म १८ एप्रिल १९२६ रोजी लंडन मध्ये झाला. ते केम्ब्रिज विद्यापिठामधील क्रिकेट टीमचे कप्तान होते आणि इतिहासाचे सेंट कँथेरिन कॉलेजचे विद्यार्थी होते. पुढे ते अनेक वर्षे इसेक्सच्या क्रिकेट संघाचे कप्तान झाले . त्यांनी इसेक्सच्या फर्स्ट क्लास क्रिकेट संघासाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २०,११३ धावा केल्या. ते त्या क्लबचे इतक्या धावा करणारे ९ वे खेळाडू होते. त्यांनी यष्टीरक्षक आणि फलंदाज म्ह्णून आणि प्रसंगी गोलंदाज म्ह्णून इंग्लंडच्या क्रिकेट विश्वात योगदान दिले. डग इन्सोल हे फुटबॉल खेळाडू होते ते अनेक प्रमुख सामन्यामध्ये फुटबॉल खेळले होते.
ते अनऑर्थडॉक्स पद्धतीतीने क्रिकेट खेळत असत. त्यांची खेळण्याची पद्धत अत्यंत वेगळी होती ते ओपन स्टान्स घेत असत , त्यांची नजर तीक्ष्ण होती तसेच त्यांची खेळताना एकाग्रता अत्यंत तीव्र होती. ते स्लिपमध्ये उत्तम क्षेत्ररक्षण करत असत. इसेक्सच्या यशामध्ये डग इन्सोल यांचा महत्वाचा वाट होता. ते खेळ अत्यंत काळजीपूर्वक समजून घेत असत त्याचप्रमाणे ते त्यांच्या खेळाडू सहकाऱ्यांमध्ये अत्यंत पॉप्युलर होते. ते गरज असेल तर पेस गोलंदाजी करत असत त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १३८ विकेट घेतल्या होत्या.
डग इन्सोल यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना २० जुलै १९५० रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला . परंतु दोनदा ते अत्यंत ‘ स्वस्तात ‘ रामाधींनकडून बाद झाले होते त्यावेळी इंग्लंडला मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ५ वर्षांनी त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यास दुसऱ्यांदा संधी मिळाली त्यावेळी इंग्लंडचा संघ टॉप ला होता , तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये त्यांनी शतक केले होते आणि इंग्लंडने ती सिरीज जिंकली. त्यानंतर ते इंग्लंडकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळले त्यात ते शून्यावर बाद झाले आणि तो त्यांचा शेवटचा कसोटी सामना होता. त्यांनी ९ कसोटी सामन्यामध्ये ४०८ धावा केल्या त्याचप्रमाणे त्यांनी १ शतक आणि १ अर्धशतक काढले. त्यांची कसोटी सामन्यामधील सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ११० धावा तसेच त्यांनी एकूण ८ झेल पकडले. त्यांनी ४५० फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये २५,२४१ धावा केल्या त्यामध्ये त्यांनी ५४ शतके आणि १२६ अर्धशतके केली. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद २१९ धावा. तसेच त्यांनी १३८ विकेट्सही घेल्या आहेत. एका इनिंगमध्ये २२ धावा देऊन त्यांनी ५ विकेट्स घेतल्या. तसेच त्यांनी ३६६ झेल पकडले असून ६ जणांना स्टंपिंग करून बाद केले आहे. ते इसेक्स कडून १९६३ पर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत होते.
डग इन्सोल यांनी शेवटचा कसोटी सामना ३० मे १९५७ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला . निवृत्तीनंतर ते ते इंग्लंडच्या क्रिकेट सिलेक्टर्स कमिटीचे चेअरमन होते तसेच १ ऑक्टोबर २००६ मध्ये एक वर्षासाठी एम. सी .सी. चे प्रसिडेंटही होते. ते एम.सी.सी. कमिटीवर २० वर्षाहून अधिक काळ होते.
१९६७ मध्ये जेफ्री बायकॉट यास ड्रॉप करण्यावरून वादंगही झाला होता.
डग इन्सोल यांचे ५ ऑगस्ट २०१७ रोजी वयाच्या ९१ वर्षी इंग्लंड येथे निधन झाले
— सतीश चाफेकर
Leave a Reply