१८ जून १९८३ रोजी भारताचे महान क्रिकेटपटू कपिलदेव यांनी कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी रचलेल्या नाबाद १७५ धावांच्या स्फोटक खेळीमुळे भारताला उपांत्य फेरीसाठी पात्र ठरता आले.
सलामीची जोडी सुनील गावस्कर आणि श्रीकांत दोघेही शून्यावर बाद झाले. त्यानंतर मोहिंदर अमरनाथ पाच व संदीप पाटील एक धावा काढून बाद झाले. भारताची अवस्था ४ बाद ९. भारताची धावसंख्या १७ असताना यशपाल शर्मा बाद झाले, तेव्हा भारताची धावसंख्या होती ५ बाद १७. अशा वेळेस कपिल देव खेळायला आले. दुसऱ्या बाजूला पण रॉजर बिन्नी होता. रॉजर बिन्नी यांच्या सोबत घेऊन त्यांनी ६० धावांची भागीदारी केली. त्यानंतर बिन्नी आणि रवी शास्त्री एकामागोमाग बाद झाले. भारताची धावसंख्या होती ७ बाद ७८. २६ व्या ओव्हर मध्ये कपिल देव यांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कपिल देव यांनी गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरु केली. पुढचे अर्धशतक त्यांनी फक्त १३ ओव्हर मध्ये पूर्ण केले. त्यानंतरच्या ५० धावा फक्त १० ओवरमध्ये पूर्ण केल्या. धावसंख्या १४० असताना मदन लाल बाद झाले. तेव्हा भारताची धावसंख्या होती ८ बाद १४०. त्यानंतर विकेटकीपर सय्यद किरमाणी खेळायला आले. त्यांच्या सोबत कपिल देव यांनी १२६ धावांची भागीदारी केली.
त्या अगोदर वर्ल्ड कप मध्ये न्यूझीलंड च्या ग्लेन टर्नर यांचा १७१ धावांचा रेकोर्ड होता .कपिल देव यांनी या डावात १७५ धावांची स्फोटक खेळी केली. यात १६ चौकार आणि ६ षटकार ठोकले . १७५ धावांची नाबाद खेळी फक्त १३८ बॉलमध्ये पूर्ण केली.कपिल देव चा स्ट्राईक रेट १२६. ८१ होता .६० व्या ओवर मध्ये भारताची धावसंख्या ८ बाद २६६. झिम्बाब्वेला २३५ धावांवर रोखत भारताने हा सामना ३१ धावांनी जिंकला होता. कपिल देव यांना मॅन ऑफ दी मॅच घोषित करण्यात आले. अंतिम फेरीत बलाढय़ वेस्ट इंडिजवर विजय मिळवून भारत पहिल्यांदा विश्वविजेता ठरला. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण नसल्याने याचे रेकॉर्डिंग उपलब्ध नाही हे दुर्दैव आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply